रिया चक्रवर्तीला न्यायालयाकडून दिलासा नाही, 20 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ

By तेजल गावडे | Published: October 6, 2020 02:21 PM2020-10-06T14:21:57+5:302020-10-06T14:25:08+5:30

ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीला न्यायालयाकडून दिलासा मिळाला नसून तिच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

Riya Chakraborty has no relief from the court, extension of judicial custody till October 20 | रिया चक्रवर्तीला न्यायालयाकडून दिलासा नाही, 20 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ

रिया चक्रवर्तीला न्यायालयाकडून दिलासा नाही, 20 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ

googlenewsNext

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स कनेक्शनमध्ये अटक झालेल्या रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होताना दिसते आहे. मुंबई कोर्टाने रिया आणि शौविक चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडीत वाढ केली असून ती 20 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. ड्रग्स खरेदी केल्याच्या आरोपाखाली रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि इतर 18 आरोपींची आज न्यायालयीन कोठडी संपणार होती. 

मागील सुनावणीमध्ये विशेष न्यायालयाने रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. याशिवाय रिया चक्रवर्तीच्या जामीन अर्जावरदेखील उच्च न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता आहे. तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि इतर 18 आरोपींच्या जामीन अर्जाला विरोध करत त्यांचा जामीन अर्ज फेटाळायला सांगितला आहे.

रियाला होऊ शकते 10 वर्षांची शिक्षा
एनसीबीने म्हटले की समाजाला विशेष करून तरूणांना संदेश देण्याची गरज आहे की अमली पदार्थाचे सेवन करण्यापासून दूर रहा. जर त्यांनी असे केले तर त्यांनादेखील अशाच प्रक्रियेला सामोरे जावे लागेल. 8 सप्टेंबरला एनसीबीने बरीच चौकशी केल्यानंतर रिया चक्रवर्तीला अटक केली होती. जर या प्रकरणात रिया चक्रवर्ती दोषी आढळली तर तिला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात एनसीबीने ड्रग्स अँगलचा तपास करत आहे. एनसीबीला या तपासात पुरावे हाती लागले आहेत. आतापर्यंत एनसीबीने 17 जणांना अटक केली आहे.

रियाविरुद्ध ईडीकडे नाही एकही सबळ पुरावा
अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्याचे एम्सच्या अहवालात शिक्कामोर्तब झाले असताना त्याची आर्थिक संपत्ती अभिनेत्री रियाने लुबाडल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) तपासातून स्पष्ट झाले आहे. सुशांतच्या खात्यावरून रिया व तिच्या कुटुंबीयांशी व्यवहार झाला नसल्याने त्यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा खटला चालवू शकत नाही, या निष्कर्षाप्रत अधिकारी पोहचले आहेत.

80 हजारांवर फेक अकाऊंटवरून मुंबई पोलिसांची बदनामी; सुशांतप्रकरणी सायबर पोलिसांचा धक्कादायक दावा

सत्य बदलू शकत नाही - रियाचे वकील
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात एम्स डॉक्टरांच्या एका पॅनेलने हत्या नाही झाली तर हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे सीबीआयला सांगितले आहे. यावर रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानेशिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, मी सीबीआयच्या अधिकृत वक्तव्याची वाट बघतो आहे, या सत्याला बदलू नाही शकतं.

Sushant Singh Rajput Case: रियाविरुद्ध ईडीकडे नाही एकही सबळ पुरावा; लवकरच मिळणार दिलासा

Web Title: Riya Chakraborty has no relief from the court, extension of judicial custody till October 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.