ड्रग्जप्रकरणात अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची नावे समोर आली होती. मीडियाने हे प्रकरण लावून धरले होते. मीडिया व चाहत्यांच्या नजरा एनसीबीच्या चौकशीवर होत्या. सोशल मीडिया व मीडियाच्या माध्यमातून ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्यांविरोधात रोज नवे खुलासे होत आहेत, दावे होत आहेत. यात दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान या तिघींसोबतच रकुलचेही नाव  होते. मात्र मीडिया ट्रायलमुळे आपल्या इमेजवर वाईट परिणाम होत असल्याचे रकुलचे म्हणणे होते.त्यामुळे कोर्टाने तिच्याविरोधात सुरु असलेले हे मीडिया ट्रायल रोखण्याचे अंतरिम आदेश द्यावे, अशी मागणी तिने केली होती. तिच्या कामामुळे कमी मात्र ड्रग्स प्रकरणामुळे रकुल तुफान चर्चेत होती. 

मी ड्रग्ज घेत नाही. ड्रग्ज विक्रेत्यांशी माझा कोणताही संबंध नाही, असा दावा तिने यावेळी केला होता. 2018 मध्ये रियासोबत ड्रग्जविषयी बोलले होते, अशी कबुली मात्र तिने दिली होती. मात्र ही कबुली देताना सगळे खापर रियाच्या डोक्यावर फोडले होते. रिया चॅटच्या माध्यमातून तिचे सामान (ड्रग्ज) मागवत होती. तिचे सामान माझ्या घरी होते, असा जबाब तिने नोंदवला होता.


आता सगळे काही दूर सारत रकुल मस्त व्हॅकेशन एन्जॉय करताना पाहायला मिळतेय. नुकतेच व्हॅकेशन दरम्यानचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रकुल टॉलिवूडमध्ये लोकप्रिय अभिनेत्री असून मानधनातही  महागडी अभिनेत्री आहे. बॉलिवूडमध्ये तिच्या वाट्याला फारसे यश आले नसले तरीही या गोष्टीचा फरक तिला पडत नाही.

‘यारियां’ हा बॉलिवूडचा तिचा पहिला सिनेमा होता. 2018 मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती ‘अय्यारी’मध्ये झळकली आणि पाठोपाठ अजय देवगणसोबत ‘दे दे प्यार दे’ हा सिनेमा तिला मिळाला. ‘दे दे प्यार दे’ हा तिचा सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमाने रकुलला बॉलिवूडमध्ये नाव दिले, पैसा , प्रसिद्धी आणि प्रतिष्ठाही मिळवून दिली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rakul Preet Singh Bold Bikini Photos From Maldives Vacation Going Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.