Priyanka Chopra's sister meera chopra receives rape threats on twitter junior ntr fans say prostitute | Shocking!! Jr NTRच्या चाहत्यांनी प्रियंका चोप्राची बहीण मीरा चोप्राला दिली बलात्काराची धमकी

Shocking!! Jr NTRच्या चाहत्यांनी प्रियंका चोप्राची बहीण मीरा चोप्राला दिली बलात्काराची धमकी

ठळक मुद्देमीरा चोप्रा ही प्रियंकाची कझिन आहे. बॉलिवूडमध्ये नाही पण साऊथ इंडस्ट्रीत मीरा चोप्रा एक मोठे नाव आहे.

बॉलिवूड व हॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राची चुलत बहीण आणि टॉलिवूडची अभिनेत्री मीरा चोप्रा हिला रेपची धमकी मिळाली आहे. सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असलेली मीरा सध्या अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल होतेय़=, काहींनी अश्लिल शिव्या दिल्यात. काहींनी तर तिला थेट पॉर्न स्टार म्हणून संबोधले. अखेर प्रकरण वाढत असल्याचे पाहून मीराने सायबर पोलिस व राष्ट्रीय महिला आयोगाकडे याबद्दल तक्रार दाखल केली, आता हे नेमके प्रकरण काय तर ते जाणून घेऊ या.

तर अलीकडे मीरा चोप्राने ट्विटरवरच्या आपल्या चाहत्यांसाठी प्रश्नोत्तराचे सेशन ठेवले होते. याचदरम्यान एका चाहत्याने मीराला साऊथचा सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरबद्दल प्रश्न केला. यावर मी ज्युनिअर एनटीआरला ओळखत नाही. मी त्याची फॅन वगैरे काहीही नाही. मी महेशबाबूची फॅन आहे, असे मीराने म्हटले. झाले, यावरून ज्युनिअर एनटीआरचे फॅन्स खवळले आणि त्यांनी मीराला शिव्या द्यायला सुरुवात केली. इतकेच करून हे फॅन्स थांबले नाहीत तर त्यांनी मीराला रेपची धमकी दिली़ तिला पॉर्न स्टार असे काय काय म्हटले.

एकीकडे ज्युनिअर एनटीआरचे चाहते मीराला ट्रोल करत होते तर दुसरीकडे मीराचे चाहते तिचे समर्थन करत होते.
सोशल मीडियावरचे ट्रोलिंगने मर्यादा ओलांडल्यानंतर मीराने याप्रकरणी सायबर पोलिस व राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली. याशिवाय एक पोस्टही केली. मी महेश बाबूची फॅन आहे, असे म्हटल्यावर काय लोक मला शिव्या घातलीय? मला महेश बाबू आवडतो म्हणून मी वेश्या व पॉर्न स्टार ठरते? असे सवाल तिने केले. यात तिने ज्युनिअर एनटीआरलाही टॅग केले.

मीरा चोप्रा ही प्रियंकाची कझिन आहे. बॉलिवूडमध्ये नाही पण साऊथ इंडस्ट्रीत मीरा चोप्रा एक मोठे नाव आहे. 2008 साली तामिळ चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होत. क़ाही हिंदी सिनेमातही ती झळकली आहे. ग़ँग आॅफ घोस्ट, कलंक, 1920 लंडन या बॉलिवूडच्या सिनेमात तिने काम केलेय.  2014 मध्ये शरमन जोशीच्या ‘1920 लंडन’ या चित्रपटातून तिचा बॉलिवूड डेब्यू झाला होता.

 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Priyanka Chopra's sister meera chopra receives rape threats on twitter junior ntr fans say prostitute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.