Priyanka Chopra picks her 3 amazing complex characters in Bollywood | Priyanka Chopra ला इंडस्ट्रीत २० वर्षे पूर्ण, सांगितल्या सर्वात आवडत्या ३ भूमिका...

Priyanka Chopra ला इंडस्ट्रीत २० वर्षे पूर्ण, सांगितल्या सर्वात आवडत्या ३ भूमिका...

बॉलिवूड ते हॉलिवूड स्टारपर्यंतचा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राने शोबिजमध्ये २० वर्षे पूर्ण झाली आहेत. बॉलिवूडमध्ये तिने अनेक यादगार भूमिका साकारल्या आहेत आणि प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अशात प्रियांकाने तिला इंडस्ट्रीमध्ये २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिला तिच्या सर्वात जास्त आवडलेल्या तीन भूमिका कोणत्या हे सांगितलं आहे. यासाठी तिने एक व्हिडीओ शेअर केलाय.

प्रियांकाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात तिने 'बाजीराव मस्तानी', '७ खून माफ' आणि 'बर्फी' या तीन सिनेमातील भूमिका तिच्या सर्वात आवडत्या भूमिका असल्याचं सांगितलं आहे.

या व्हिडीओसोबत प्रियांकाने पोस्ट लिहिलि की, 'मनोरंजन क्षेत्रात माझी २० वर्षे पूर्ण...मला काही वेगळ्या, यादगार भूमिका साकारण्याचं सौभाग्य मिळालं, या भूमिका एकापेक्षा एक दिग्दर्शकांनी उभारल्या होत्या. आज मी अशा ती अद्भूत भूमिकांबाबत बोलत आहे ज्या मी काळानुसार साकारल्या आहेत. खोली, संघर्ष आणि लवचीकपणा. ३ अद्भूत दिग्दर्शकांसोबत काम केलं. मला वाटतं ते एक संस्था आहेत'.

प्रियांका सध्या अमेरिकेत राहत असून वेगवेगळ्या हॉलिवूड सिनेमांमध्ये काम करत आहे. अनेक सिनेमांचं शूटींग तिने पूर्णही केलं आहे. तसेच तिचं पुस्तकही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ज्यात तिने तिच्या जीवनातील काही खास पैलू उलगडले आहेत. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Priyanka Chopra picks her 3 amazing complex characters in Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.