डिप्रेशनचा धंदा करणाऱ्यांना जनतेनं दाखवली 'औकात', कंगना रानौतने दीपिका पादुकोणवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 03:18 PM2020-08-20T15:18:21+5:302020-08-20T15:19:02+5:30

कंगना राणौतने दीपिका पादुकोणचे नाव न घेता तिच्यावर निशाणा साधला आहे.

People show 'Aukat' to those dealing with depression, Kangana Ranaut targets Deepika Padukone | डिप्रेशनचा धंदा करणाऱ्यांना जनतेनं दाखवली 'औकात', कंगना रानौतने दीपिका पादुकोणवर साधला निशाणा

डिप्रेशनचा धंदा करणाऱ्यांना जनतेनं दाखवली 'औकात', कंगना रानौतने दीपिका पादुकोणवर साधला निशाणा

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयला करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. सुशांतने डिप्रेशनमुळे इतक्या टोकाचं पाउल उचलले असल्याचे सांगितले जात होते. दरम्यान सुशांतची आत्महत्या नव्हे तर हत्याच आहे, असा आरोप सातत्याने अभिनेत्री कंगना राणौत करत आहे. त्यात आता तिने डिप्रेशनच्या मुद्द्यावर अभिनेत्री दीपिका पादुकोणवरही निशाणा साधला आहे.

कंगना रणौतच्या टीमने ट्विट केले की, माझ्यामागून बोला. डिप्रेशनचा धंदा करणाऱ्यांना जनतेने औकात दाखवली आहे.

कंगना राणौतनेदीपिका पादुकोणचे नाव न घेता तिच्यावर निशाणा साधला आहे. दीपिकानेदेखील डिप्रेशनचा सामना केला आहे. त्यातून बाहेर पडल्यानंतर तिने मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीची मोहीम हाती घेतली. सुशांतच्या मृत्यूलाही तिने डिप्रेशनशी जोडले.

 

सुशांतच्या मृत्यूनंतर दीपिकाने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. दीपिका पोस्टमध्ये म्हणाली होती, "माझ्या मागून बोला, डिप्रेशन, डिप्रेशन म्हणजे दुखी होणे नाही, माझ्या मागून बोला तुम्ही डिप्रेशनपासून कधीच दूर पळू शकत नाही. कंगनानेदेखील आपल्या या ट्वीटमध्ये दीपिकाच्या माझ्या मागून बोला या वाक्याचा उपयोग केला आहे. ज्यावरून तिने हे दीपिकाला उद्देशूनच म्हटल्याचे स्पष्ट होते.

Web Title: People show 'Aukat' to those dealing with depression, Kangana Ranaut targets Deepika Padukone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.