'छताला लटकलेली दिसेन, पण ती माझी आत्महत्या नसेल'; पायल घोषचं खळबळजनक विधान

By अमित इंगोले | Published: September 24, 2020 12:35 PM2020-09-24T12:35:45+5:302020-09-24T12:56:12+5:30

पायल घोषने अनुराग कश्यप विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. अशात आता तिने तिची हत्या होऊ शकते अशी शंकाही व्यक्त केलीय.

Payal Ghosh who has filed a complaint against Anurag Kashyap said if found hanging its not suicide | 'छताला लटकलेली दिसेन, पण ती माझी आत्महत्या नसेल'; पायल घोषचं खळबळजनक विधान

'छताला लटकलेली दिसेन, पण ती माझी आत्महत्या नसेल'; पायल घोषचं खळबळजनक विधान

googlenewsNext

अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक-निर्माता अनुराग कश्यप विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. पायलने आता एक ट्विट करून लिहिले की, एका जुन्या मुलाखतीत ती अनुराग कश्यप विरोधात बोलली होती. पण त्या पोर्टलला अनुरागकडूनच परवानगी हवी होती. पायलने तिच्या ट्विटमध्ये तिची हत्या होण्याचा संशय व्यक्त केलाय.

पायल घोषने ट्विट करत लिहिले की, 'मिस्टर अनुराग विरोधात मी एका प्रसिद्ध पोर्टलला या घटनेसंदर्भात एक मुलाखत दिली होती आणि नंतर मला समजलं की, त्यांना यासाठी कश्यपची परवानगी हवी होती. भारत, जर मी फासावर लटकलेली आढळले तर लक्षात ठेवा ती मी स्वत:हून केलेली आत्महत्या नसेल. #MeToo.'

दरम्यान, अनुराग कश्यप विरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप लावणाऱ्या पायलने त्याच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी वकिलासोबत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेल्या अभिनेत्रीने लिखित तक्रारीत दिग्दर्शका विरोधात इतरही गंभीर आरोप लावले आहेत.

अभिनेत्री पायलच्या वकिलाने सांगितले की, अनुराग विरोधात IPC च्या सेक्शन 376, 354, 341, 342 नुसार तक्रार देण्यात आली आहे. पायल सोमवारी तक्रार देण्यासाठी गेली होती. पण त्यावेळी तक्रार दाखल होऊ शकली नाही. रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस नव्हती आणि हेही ठरत नव्हतं की, हे प्रकरण कोणत्या पोलीस स्टेशन अंतर्गत येतं.

कधी झाली होती भेट?

‘फ्रीडम’ या चित्रपटादरम्यान पीडित अभिनेत्रीची भेट कश्यपसोबत झाली होती. त्यावेळी तो ‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. त्याच दरम्यान म्हणजे २०१४-१५ मध्ये हा प्रकार घडल्याचे तिचे म्हणणे आहे. तिने कुटुंबीय आणि मित्र मैत्रिणीना घडलेला प्रकार सांगितल्यावर याबाबत वाच्यता करू नको असा सल्ला तिला त्यांच्याकडून देण्यात आला. तसेच ट्विटरवरील पोस्ट घरच्यांनी तिला डिलीट करायला लावली असे तिचे म्हणणे आहे.

काय म्हणाली होती पायल?

पायल घोषने ट्विट करत लिहिले होते की, 'अनुराग कश्यपने माझ्यासोबत जबरदस्ती केली आणि गैरवर्तन केलं. पीएमओ आणि नरेंद्र मोदीजी यावर अ‍ॅक्शन घ्या. या क्रिएटीव्ह व्यक्तीच्या मागे लपलेला राक्षस देशाला दाखवा. मला हे माहीत आहे की, तो मला नुकसान पोहोचवू शकतो आणि माझी सुरक्षा धोक्यात आहे. कृपया माझी मदत करा'.

हे पण वाचा :

'कास्टिंग काउच करून रोल मिळवण्यासाठी आलेल्या अभिनेत्रीवर भडकला होता अनुराग'

तापसी पन्नू म्हणाली - 'जर अनुराग कश्यप लैंगिक अत्याचारात दोषी आढळला तर....'

अनुराग दोषी असेल तर...; राजश्री देशपांडेने पायल घोषला लिहिले खुले पत्र

अनुराग कश्यपवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपांबाबत हुमा कुरेशीने केली पोस्ट, म्हणाली -

Web Title: Payal Ghosh who has filed a complaint against Anurag Kashyap said if found hanging its not suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.