Huma Qureshi posts her anger over Payal Ghosh dragged her name in Anurag Kashyap sexual harassment matter | अनुराग कश्यपवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपांबाबत हुमा कुरेशीने केली पोस्ट, म्हणाली -

अनुराग कश्यपवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपांबाबत हुमा कुरेशीने केली पोस्ट, म्हणाली -

अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर आरोप लावण्यासोबतच या प्रकरणात इतरही काही अभिनेत्रींची नावे घेतली होती. पायलने रिचा चढ्ढा, हुमा कुरेशी आणि माही गिल यांची नावे घेऊन दावा केला होता अनुरागचे साधारण २०० मुलींसोबत संबंध राहिले आहेत. रिचा चढ्ढाने यावर प्रेस रिलीज जारी केली आहे. आता अभिनेत्री हुमा कुरेशी याबाबत सोशल मीडियात पोस्ट केली आहे. तिने लिहिले की, या सगळ्यात ओढलं जात असल्याने राग येतो आहे.

हुमा कुरेशीने लिहिले की, मी आणि अनुरागने २०१२-१३ मध्ये सोबत काम केलं होतं. तो एक चांगला मित्र आणि टॅलेंटेड दिग्दर्शक आहे. माझ्या पर्सनल अनुभवानुार आणि माहितीनुसार त्याने माझ्यासोबत किेंवा इतर कुणासोबत चुकीचा व्यवहार केला नाही. जे कुणी हे दावे करत असतील की, त्यांच्यासोबत चुकीचं झालं. त्यांनी पोलीस आणि न्यायालयात जावं. मी आतापर्यंत यावर काहीच बोलले नाही कारण सोशल मीडियावरील भांडणात मला विश्वास नाही.

मला या सगळ्यात ओढलं जातंय त्याचा मला राग येतोय. मला फक्त केवळ माझ्यासाठीच तर त्या प्रत्येक महिलेसाठी राग येतो ज्या वर्षानुवर्षाच्या मेहनतीनंतर आणि संघर्षानंतर ज्यांना आधारहीन आणि घाणेरड्या आरोपांमध्ये ओढलं जातं. प्लीज या सर्व गोष्टींपासून दूर रहा. महिला आणि पुरूष दोघांचीही जबाबदारी आहे की, #MeToo ची पवित्रता कायम ठेवावी.

अनुराग कश्यपने पायलकडून करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. त्याच्यावर आरोप झाल्यानंतर बॉलिवूडमधील वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबतच त्याच्या दोन्ही एक्स वाइफच्या त्याच्या सपोर्टमध्ये समोर आल्या. तापसी पन्नूने तर अनुरागला महिलांच्या अधिकारांसाठी लढणारा सर्वात मोठा फेमिनिस्ट म्हटलंय.

काय म्हणाली एक्स वाइफ कल्कि?

सोशल मीडियात सतत अ‍ॅक्टिव राहणारी अभिनेत्री कल्किने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, 'प्रिय अनुराग सोशल मीडियात सुरू असलेल्या या सर्कसला स्वत:वर स्वार होऊ देऊ नकोस. तू तुझ्या स्क्रीप्ट्समधून महिलांच्या स्वातंत्र्यासाठी लढला आहेस. तू तुझ्या पर्सनल लाइफसोबत प्रोफेशनल लाइफमध्येही त्यांच्या सन्मानाची रक्षा केली आहेस. मी याची साक्षीदार आहे. कारण प्रोफेशनल आणि पर्सनल स्पेसमध्ये तू मला बरोबरीची जागा दिली आहे'.

कल्किने पुढे लिहिले की, 'इतकेच काय तर आपल्या घटस्फोटानंतही तू माझ्या सन्मानासाठी उभा राहिला होता. आपण सोबत येण्याआधीपासून मी काम करायला घाबरत होते तेव्हापासून मला सपोर्ट केलाय. काळ वाईट आहे. सगळे एकमेकांना शिव्या देत आहेत आणि खोटे आरोप लावत आहेत. तुला अशात मजबूत राहण्याची गरज आहे'.

पहिल्या पत्नीनेही केली पोस्ट

आरती बजाजने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिले की, 'अनुराग कश्यप तू रॉकस्टार आहेस. ज्याप्रकारे तू महिलांना सशक्त करतो, तसं करणं आणि त्या सर्वांसाठी सुरक्षित स्थळ तयार करणं सुरू ठेव. हे मी सर्वातआधी आपल्या मुलीत बघते. जगात जराही इमानदारी शिल्लक राहिलेली नाही आणि जगात बेकार लोक भरलेले आहेत. जर हे लोक त्यांच्या ऊर्जेचा वापर द्वेष पसरवण्यात लावत नसते आणि त्याचा रचनात्मक वापर झाला असता तर जग आणखी चांगलं झालं असतं.

हे पण वाचा :

अनुराग कश्यपवरील आरोपाबाबत त्याची एक्स-वाइफ आरती बजाजकडून पोस्ट, म्हणाली....

अनुराग कश्यपच्या सपोर्टसाठी समोर आली राधिका आपटे, म्हणाली - 'तुझ्यासोबत नेहमीच सुरक्षित वाटलं'

पायल घोषच्या आरोपांवर भडकली माही गिल, अनुराग कश्यपला केला सपोर्ट

तू सर्वांत मोठा स्त्रीवादी...! तापसी पन्नू अनुराग कश्यपसाठी मैदानात उतरली अन् ट्रोल झाली

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Huma Qureshi posts her anger over Payal Ghosh dragged her name in Anurag Kashyap sexual harassment matter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.