मी त्याची कशी मदत करू शकते सांगा...!  झोमॅटोच्या ‘कामराज’ला परिणीती चोप्राची साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 14:19 IST2021-03-14T14:18:07+5:302021-03-14T14:19:32+5:30

झोमॅटोचा एक डिलिव्हरी बॉय आणि बेंगळुरूतील एका महिलेने केलेले त्याच्यावरचे आरोप सध्या चर्चेत आहेत. हे प्रकरण गाजत असताना आता बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने या वादात उडी घेतली आहे.

parineeti chopra appeals zomato to find truth on delivery boy and woman hitting case | मी त्याची कशी मदत करू शकते सांगा...!  झोमॅटोच्या ‘कामराज’ला परिणीती चोप्राची साथ

मी त्याची कशी मदत करू शकते सांगा...!  झोमॅटोच्या ‘कामराज’ला परिणीती चोप्राची साथ

ठळक मुद्देसंबंधित डिलिव्हरी बॉय सध्या अटकेत आहे. कामराज त्याचे नाव. कामराजने त्याच्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. 

झोमॅटोचा एक डिलिव्हरी बॉय आणि बेंगळुरूतील एका महिलेने केलेले त्याच्यावरचे आरोप सध्या चर्चेत आहेत. ऑर्डर  रद्द केल्यामुळे झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने आपल्या नाकावर बुक्का मारल्याचा आरोप संबंधित महिलेने केला होता. मात्र यानंतर आरोप झेलणा-या त्या डिलिव्हरी बॉयने वेगळीच आपबीती सांगितली होती. मी नाही तर त्या महिलेनेच मला मारहाण केली होती, असा उलट आरोप त्याने केला होता. हे प्रकरण गाजत असताना आता बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने या वादात उडी घेतली आहे. तुमचा हा डिलिव्हरी बॉय निर्दोष आहे, याची मला खात्री आहे. झोमॅटो इंडिया, मी त्याची कशी मदत करू शकते, ते कृपया सांगा, असे  ट्विट परिणीतीने केले आहे.


 ‘झोमॅटो इंडिया कृपया या प्रकरणातील सत्य शोधून काढा आणि आलेला रिपोर्ट सार्वजनिक करा. जर तो व्यक्ती निर्दोष असेल तर त्या महिलेविरोधात कारवाई करण्यासाठी मदत करा. हा प्रकार अमानविय आहे. तो व्यक्ती निर्दोष असल्याची मला पुर्ण खात्री आहे. कृपया मी त्या व्यक्तीला कशी मदत करु शकते याबाबत मला मार्गदर्शन करा,’ असे परिणीतीने तिच्या  ट्विटमध्ये म्हटले आहे.
 संबंधित डिलिव्हरी बॉय सध्या अटकेत आहे. कामराज त्याचे नाव. कामराजने त्याच्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. 

कामराजने काय सांगितले?

जेव्हा मी पार्सल घेऊन या महिलेच्या घरी पोहोचलो तेव्हा थोडा उशिर झाला होता. मी त्यांची त्यासाठी माफी मागितली. रस्ता खराब आणि वाहतूक कोंडीमुळे पोहोचण्यास उशिर झाला, असे सांगितले. मी दोन वर्षांपासून काम करत आहे, अशा प्रकरच्या घटनेला पहिल्यांदाच तोंड देत आहे, असे कामराज म्हणाला. 
हितेशाने जेवण ताब्यात घेतले परंतू तिने पैसे देण्यास नकार दिला. ती म्हणाली की ती झोमॅटो कस्टमर सपोर्टशी बोलत आहे. हितेशाने यानंतर त्याला अश्लिल शिव्या दिल्या व जोरजोरात ओरडायला लागली. तर झॉमॅटो सपोर्टने कामराजला आॅर्डर कॅन्सल केल्याचे सांगितले. यामुळे कामराजने तिला जेवण परत करण्यास सांगितले. जेव्हा तिने ते मागे देण्यास नकार दिला तेव्हा तिथून कामराज निघून जात होता. 
यानंतरही ती त्याला शिव्या देत होती. अचानक तिने त्याच्यावर चप्पल उगारली आणि मारायला सुरुवात केली. मी तिला रोखण्यासाठी हात पुढे केला. यावेळी तिने चुकून तिचाच हात नाकावर मारला. मी फक्त तिचा वार रोखण्यासाठी हात पुढे केला होता. तिच्या बोटातील अंगठी तिच्या नाकावर लागली. तिचा व्हिडीओ पाहिल्यास त्यामध्ये स्पष्ट दिसेल असेही त्याने पोलिसांना सांगितले.  तिच्या नाकावर जखम झाली ती अंगठीमुळे झालीय, ठोसा लगावल्यामुळे नाही, असे तो म्हणाला. 

Web Title: parineeti chopra appeals zomato to find truth on delivery boy and woman hitting case