Oops Moment: Rakul Preet Singh’s dress flies in the air | रकुल प्रीत सिंगची Oops Moment झाली कॅमेऱ्यात कैद, मिनी ड्रेसनं केली फजिती...!

रकुल प्रीत सिंगची Oops Moment झाली कॅमेऱ्यात कैद, मिनी ड्रेसनं केली फजिती...!

ठळक मुद्दे‘यारियां’ हा तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा.  2018 मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती ‘अय्यारी’मध्ये झळकली आणि पाठोपाठ अजय देवगणसोबत ‘दे दे प्यार दे’ हा सिनेमा तिला मिळाला.

साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंग तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. पण अलीकडे याच स्टायलिश कपड्यांमुळे रकुलवर फजिती ओढवली. ती ऊप्स मोव्हेंटची शिकार ठरली.
अलीकडे रकुल  वनपीस ड्रेसमध्ये दिसली. लेमन यलो कलरचा ड्रेस,त्यावर डेनिम जॅकेट, मोकळे केस आणि ओठांवर नेहमीसारखे सुंदर हास्य अशा अवतारात ती अतिशय सुंदर दिसत होती. आता इतक्या सुंदर बालेचे फोटो कॅमे-यात कैद करण्याचा मोह कुणाला होणार नाही? रकुलला पाहून फोटोग्राफर्सआपल्या कॅमे-यांसोबत पुढे सरसावले. रकुल या फोटोग्राफर्सला मस्तपैकी पोज देण्यात दंग असताना अचानक हवेची झुळूक आली आणि रकुलचा ड्रेस हवेनं उडू लागला. रकुलने आपल्या हाताने ड्रेस पकडत कशीतरी परिस्थिती सांभाळून घेतली. पण तिची ही फजिती कॅमे-यात कैद झालीच. 

रकुल सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. रकुलने ‘गिल्ली’ या कन्नड सिनेमाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तामिळ व तेलगू सिनेमातही ती झळकली. 2014 साली तिने बॉलिवूड डेब्यू केला.

‘यारियां’ हा तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा.  2018 मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती ‘अय्यारी’मध्ये झळकली आणि पाठोपाठ अजय देवगणसोबत ‘दे दे प्यार दे’ हा सिनेमा तिला मिळाला. ‘दे दे प्यार दे’ हा तिचा सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमाने रकुलला बॉलिवूडमध्ये नाव दिले, पैसा दिला, ग्लॅमर दिले.

  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Oops Moment: Rakul Preet Singh’s dress flies in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.