ठळक मुद्देसोशल मीडियावरील तिचे फोटो पाहता  हॉटनेसच्या बाबतीत मौनी रॉय बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींनाही टक्कर देताना दिसते.

 टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय सध्या लंडनमध्ये एका चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे आणि इकडे भारतात तिच्याबद्दल वेगळीच चर्चा सुरु झालीय. होय, मौनीने गुपचूप साखरपुडा उरकल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. या चर्चा का सुरु झाल्या तर मौनीच्या इन्स्टाग्राम स्टोरी पोस्टने.
होय, टीव्ही अभिनेत्री रोशनी चोप्राने एक इन्स्टाग्राम फिल्चर लॉन्च केले. ते मौनीनेही या फिल्टरसोबत एक व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ पाहून मौनीच्या साखरपुड्याच्या चर्चा सुरु झाल्यात.

या व्हिडीओत मौनीच्या रिंग फिंगरमध्ये एक मोठी डायमंडची अंगठी दिसतेय. ही अंगठी पाहून मौनीची एन्गेजमेंट झाल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला. व्हिडीओत मौनी अंगठी फ्लॉन्ट करताना दिसतेय. आता ती तिच्या एन्गेजमेंटची आहे की नाही, हे मात्र तिलाच ठाऊक

छोट्या पडद्यावरील नागिन म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मौनी रॉय सध्या बॉलिवूडमध्ये आपलं नशीब अजमावत आहे.  २००६ साली एकता कपूरची मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मधून करिअरची सुरुवात करणा-या मौनीने ‘गोल्ड’या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.लवकरच ती रणबीर व आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झळकणार आहे.

सोशल मीडियावरील तिचे फोटो पाहता  हॉटनेसच्या बाबतीत मौनी रॉय बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींनाही टक्कर देताना दिसते.
 मौनी तिच्या इन्स्टाग्रामवर नेहमीच हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. अभिनयासोबतच ती एक उत्तम डान्सर सुद्धा आहे. तिचे काही डान्स व्हिडिओसुद्धा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाहायला मिळतात.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mouni roy flaunts huge diamond ring finger in london secretly engaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.