ठळक मुद्देमाही गिल हिने 2003 मध्ये अमितोज मानच्या ‘हवाएं’ या पंजाबी चित्रपटामधून करिअरला सुरूवात केली होती.

देव डी, साहेब बीवी और गँगस्टर अशा चित्रपटांतून चाहत्यांचा मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री माही गिल हिने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला होता. मी अद्याप लग्न केलेले नाही. पण मला अडीच वर्षांची मुलगी आहे. मी रिलेशनशिपमध्ये आहे, असे तिने सांगितले होते. यावर्षी ऑगस्टमध्ये माझी मुलगी तीन वर्षांची होईल, असेही तिने सांगितले होते.  माहीच्या मुलीचे नाव वेरोनिका आहे. अर्थात ही मुलगी माहीने दत्तक घेतलेली आहे की तिने तिला जन्म दिला आहे, याचा खुलासा मात्र माहीने केलेला नाही. याच माहीला बॉलिवूडमध्ये अनुराग कश्यपचा ‘देव डी’ हा सिनेमा कसा मिळाला, हा किस्सा चांगलाच इंटरेस्टिंग आहे. होय, बर्थ डे पार्टीत काहीही ध्यानीमनी नसताना अचानक माहीला या चित्रपटाची ऑफर मिळाली.

होय, अलीकडे माहीने स्वत: हा खुलासा केला. तिने सांगितले की, मला अनेकदा पार्ट्यांमध्ये बोलवले जायचे. एकदा मी एका बर्थ डे पार्टीला गेले. पार्टीत मी चार तास डान्स करत होते. त्या पार्टीत दिग्दर्शक अनुराग कश्यपही हजर होता. पण मला त्याबद्दल काहीही कल्पना नव्हती. अनुरागने त्या पार्टीत मला नोटीस केले आणि अचानक मला ‘देव डी’ या चित्रपटाची ऑफर दिली.

 इतकी मोठी ऑफर कुठली मुलगी सोडणार? माहीने ती ऑफर स्वीकारली आणि माही गिल या चित्रपटानंतर चांगलीच चर्चेत झाली. या चित्रपटासाठी माहीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) हा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. याच चित्रपटाने माहीला खरी ओळख दिली.

माही गिल हिने 2003 मध्ये अमितोज मानच्या ‘हवाएं’ या पंजाबी चित्रपटामधून करिअरला सुरूवात केली होती.  देव डीनंतर  साहेब बीवी और गँगस्टर  , दबंग, पान सिंग तोमर अशा अनेक चित्रपटांत ती झळकली.


Web Title: mahi gill tel how she gets her first movie at the birthday party
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.