सोनू सूदला पहिला सिनेमा मिळण्याची मजेदार कहाणी, ऑडिशनचा किस्सा वाचून व्हाल हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 04:27 PM2020-09-02T16:27:43+5:302020-09-02T16:40:32+5:30

संपूर्ण देशात सोनू सूदची फॅन फॉलोइंग चांगलीच वाढली आहे. नुकतेच सोनू सूदने नेहा धुपिया पॉडकास्टमध्ये त्याच्या जीवनाबाबत काही आश्चर्यकारक किस्से शेअर केले आहेत.

Know the story how Sonu Sood bagged his first film | सोनू सूदला पहिला सिनेमा मिळण्याची मजेदार कहाणी, ऑडिशनचा किस्सा वाचून व्हाल हैराण!

सोनू सूदला पहिला सिनेमा मिळण्याची मजेदार कहाणी, ऑडिशनचा किस्सा वाचून व्हाल हैराण!

googlenewsNext

बॉलिवूडमध्येसोनू सूद आपल्या सिनेमांसोबतच दिलदारपणामुळेही ओळखला जातो. सध्या सोनू मोकळ्या हाताने वेगवेगळ्या लाोकांची करतो आहे. ज्याचा परिणाम असा झाला की,  संपूर्ण देशात सोनू सूदची फॅन फॉलोइंग चांगलीच वाढली आहे. नुकतेच सोनू सूदने नेहा धुपिया पॉडकास्टमध्ये त्याच्या जीवनाबाबत काही आश्चर्यकारक किस्से शेअर केले आहेत.

तमिळ सिनेमातून केलं होतं डेब्यू

तसा तर सोनू मुख्यपणे हिंदी सिनेमातील कलाकार मानला जातो. पण त्याने तमिळ, तेलुगू आणि पंजाबीसहीत अनेक भाषांमध्ये सिनेमे केले आहेत. अनेकांना हे माहीत नसेल की, सोनू ने डेब्यू हिंदी नाही तर तमिळ सिनेमातून केलं होतं.

कसं झालं होतं डेब्यू सिनेमाचं ऑडिशन 

हा सिनेमा तमिळ होता त्यामुळे सोनूने एका पुस्तकातील काही तमिळ शब्द शिकायला सुरूवात केली होती. असं करून त्याला फिल्ममेकर्सना इंम्प्रेस करायचं होतं. ज्या पुस्तकातून सोनू सूद तमिळ शब्द शिकत होता ते पुस्तक त्याला त्याच्या आईने गिफ्ट केलं होतं. 

असा मिळाला सिनेमा

सोनू सूदने सांगितले की, ऑडिशनमध्ये डायरेक्टर आणि निर्मात्यांना त्याने हाय-हॅलो केलं. त्यानंतर त्यांनी सोनूला सांगितले की, तुझं शर्ट काढ. कारण त्यांना त्याची बॉडी बघायची होती. सोनू शर्ट काढलं आणि जसं त्याने शर्ट काढलं सोनूला तो सिनेमा मिळाला.

शहीद ए आजममधून केलं बॉलिवूडमध्ये डेब्यू

२००२ मध्ये सोनू सूदने 'शहीद-ए-आजम' सिनेमातून डेब्यू केलं होतं. यात त्यान महान क्रांतिकारक भगत सिंह यांची भूमिका साकारली होती. या सिनेमातील सोनूच्या कामाने निर्माते फार खूश झाले होते. याचंही एक खास कारण होतं.

भगत सिंह यांच्यासोबत शिकले होते सोनू सूदचे आजोबा

सोनू सूदने सांगितले की, त्याचे आजोबा भगत सिंह यांच्यासोबत लाहोर कॉलेजमध्ये शिकत होते. याचा परिणाम असा झाला की, सोनू सूदला सिनेमाच्या निर्मात्यापेक्षा जास्त भगत सिंह यांची माहिती होती. या गोष्टीने निर्माता फारच खूश होता. 

हे पण वाचा :

'भावा मला Amazon Prime च्या मेंबरशीपसाठी मदत कर ना'; चाहत्याच्या मागणीवर सोनू सूद म्हणतो...

क्या बात! ७० वर्षांपासून गावात नव्हता रस्ता, सोनू सूदपासून प्रेरणा घेऊन गावकऱ्यांनी स्वत: तयार केला

रोजगारासोबत डोक्यावर छत...! सोनू सूदने मजुरांना दिले आणखी एक वचन

Web Title: Know the story how Sonu Sood bagged his first film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.