बॉलिवूडची बार्बी गर्ल म्हणजेच अभिनेत्री कतरिना कैफ आपल्या ड्रेसिंग सेन्सने चाहत्यांना वेगवेगळ्या स्टाइलिंग टिप्स देत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर लाल रंगाच्या साडीतील फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसते आहे.

कतरिना कैफने प्रिंटेंड लाल रंगाची साडी व टिकलीमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत ती सिंपल दिसत असली तरी  खूपच स्टनिंग दिसते आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना पहायला मिळतो आहे. 


कतरिनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशीमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोघांव्यतिरिक्त या चित्रपटात गुलशन ग्रोवर, अभिमन्यू सिंग, नीना गुप्ता हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट मार्च, २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे.


बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री लग्नाचा विचार करत असताना तू लग्नाचा विचार कधी करणार आहेस असे कॅटरिना कैफला नुकतेच विचारण्यात आले आणि तिने देखील लग्न, मुले याविषयी दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.तिने म्हटले होते की, लग्न करायचे असे काही वर्षांपूर्वी माझ्या डोक्यात नक्कीच होते. पण काही कारणांनी त्यावेळी ते शक्य होऊ शकले नाही. तुमच्या आयुष्यात ज्या प्रमाणे गोष्टी लिहून ठेवल्या असतात, त्याच प्रकारे त्या घडतात असे मला वाटते. त्यामुळे त्या गोष्टींविषयी आता मी विचार करणे बंद केले आहे.


माझ्या आयुष्यात काही गोष्टी माझ्या मर्जीप्रमाणे झाल्या नाहीत. त्याचा त्रास देखील मला खूप सहन करावा लागला. पण आता मी सगळ्या गोष्टी देवावर सोडल्या आहेत. योग्य वेळी ती व्यक्ती माझ्या आयुष्यात येईल याची मला खात्री आहे. आता हा व्यक्ती सलमान तर नाही ना यावरही चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या.

Web Title: Katrina Kaif looks simple but beautiful in red color saree, she shared photo on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.