Jaya Bachchan called Karishma Kapoor her daughter in law in an event | VIDEO: जया बच्चन सर्वांसमोर करिश्माला म्हणाल्या होत्या 'सूनबाई', बघा कशी लाजली होती...

VIDEO: जया बच्चन सर्वांसमोर करिश्माला म्हणाल्या होत्या 'सूनबाई', बघा कशी लाजली होती...

अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूरची लव्हस्टोरी एकेकाळी चांगलीच चर्चेत आली होती. दोघांनी साखरपुडा केल्याची माहिती समोर आली आहे. पण नंतर काही कारणांनी हे नातं तुटलं. मात्र, एका इव्हेंटमध्ये जया बच्चन यांनी भर मीडियासमोर याची घोषणा केली होती आणि करिश्माला आपली सून असं सांगितलं होतं. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

या इव्हेंटमध्ये अमिताभ बच्चनची मुलगी श्वेता बच्चन आणि तिचे सासरचे लोकही उपस्थित होते. श्वेताचं लग्न करिश्माची आत्याच्या मुलगा निखिल नंदासोबत झालं आहे. या इव्हेंटमध्ये जया बच्चन सांगतात की, आता कपूर खानदानासोबतही त्यांचं नातं जुळलं जाणार आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये जया बच्चन करिश्माला त्यांची सून म्हणून लोकांना भेटवतात. आणि सांगतात की, अभिषेकने आपल्या वडिलांना ६०व्या वाढदिवसाला हे गिफ्ट दिलं आहे. 

५ वर्षे होतं दोघांचं अफेअर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचं साधारण ५ वर्षे अफेअर सुरू होतं. त्यांच्या लग्नाच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. पण जया बच्चन यांनी केलेल्या या घोषणेच्या १ वर्षांनंतर म्हणजे २००३ मध्ये करिश्माचं लग्न संजय कपूरसोबत झालं होतं. 

करिश्मा आणि अभिषेकचं लग्न तुटल्यावर वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू झाली होती. काही रिपोर्ट्सनुसार, बबिता या नात्याने खूश नव्हती. कारण त्यावेळी अभिषेकचे सिनेमे चालत नव्हते. तेच काही बातम्यांनुसार, जया बच्चन यांना मान्य नव्हतं की, करिश्माने लग्नानंतरही काम सुरू ठेवावं.

करिश्मा कपूरने बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केलं होतं. तिला दोन मुलंही आहेत आणि घटस्फोट झाला आहे. तेच अभिषेकने ऐश्वर्यासोबत लग्न केल आणि त्यालाही एक मुलगी आहे. दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Jaya Bachchan called Karishma Kapoor her daughter in law in an event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.