योगा करतानाचे शिल्पाचे फोटो पाहून पतीही स्वतःला रोखू शकला नाही, सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 01:11 PM2020-12-31T13:11:29+5:302020-12-31T13:16:12+5:30

शिल्पाने योगा करतानाचा फोटो शेअर केला. हा फोटो पाहून चाहत्यांचीही नजर तिच्यावरुन हटत नाही. इतकी ती सुंदर दिसत आहे. तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज कुणालाही घायाळ करेल.

Jacqueline Fernandez and Raj Kundra commented on Shilpa Shetty Yoga Pic | योगा करतानाचे शिल्पाचे फोटो पाहून पतीही स्वतःला रोखू शकला नाही, सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल

योगा करतानाचे शिल्पाचे फोटो पाहून पतीही स्वतःला रोखू शकला नाही, सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल

googlenewsNext

कलाकार मंडळी कायम त्यांच्या कामातच बिझी असतात. शुटिंगच्या धबडग्यात त्यांना इतर गोष्टींसाठी किंवा आपल्या कुटुंबीयांना वेळ देणं तितकं शक्य नसतं. मात्र काही जण याला अपवाद असतात. सारं काही सांभाळून हे कलाकार आपल्या कुटुंबाला तितकाच वेळ देतात, शिवाय इतर गोष्टींसाठी आवर्जून वेळ काढतात. आपल्या आवडीनिवडीच्या गोष्टींसाठी ते वेळ राखून ठेवतात. या काळात कलाकार आपले छंद आणि आवड जपतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. शिल्पाला योगाची आवड आहे हे जगाला माहिती आहे. 

नुकतेच शिल्पाने योगा करतानाचा फोटो शेअर केला. हा फोटो पाहून चाहत्यांचीही नजर तिच्यावरुन हटत नाही. इतकी ती सुंदर दिसत आहे. तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज कुणालाही घायाळ करेल. सोशल मीडियावर सध्या शिल्पाच्या या फोटोची चर्चा रंगली आहे. यातील एका फोटोत शिल्पाचा स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही. मादक अदा आणि त्याहून सेक्सी पोझ आणि हॉट ड्रेसिंग अशा अवतारात शिल्पाचा हा फोटो आहे. शिल्पाच्या या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.

शिल्पा शेट्टीने तिचे हे फोटो शेअर केल्यानंतर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस देखील आश्चर्यचकित झाली. जॅकलिनेही तिच्या फोटोंवर कमेंट केली. जॅकलिनची कमेंट पाहून पती राज कुंद्रा तरी कसा मागे राहणार माग त्यानेही पत्नीचे कौतुक करत फोटोवर कमेंट केली आहे. सध्या शिल्पा गोवामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.


हॉट आणि मादक अदांनी चाहत्यांना घायाळ करण्याची ही काही पहिली वेळ नाही.यापूर्वीही तिने आपल्या ग्लॅमरस अदांनी सा-यांना याड लावले होते.शिल्पा सिनेमांमध्ये झळकत नसली तरीही २०२० हे वर्ष तिच्यासाठी खासच राहिले.

याच वर्षी तिच्या आयुष्यात लहान परीचे आगमन झाले. सरोगसीच्या माध्यमातून ती दुस-यांदा आई बनली. तर वर्ष सरते शेवटी नवीन रेस्टॉरंट सुरू केले.आलिशान रेस्टॉरंटचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.

Web Title: Jacqueline Fernandez and Raj Kundra commented on Shilpa Shetty Yoga Pic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.