बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली एकापेक्षा एक दमदार चित्रपट बनवत असतो. त्याच्या चित्रपटाला आजही प्रेक्षकांची पसंती मिळते. इम्तियाजने जब वी मेट, तमाशा, हायवे, रॉकस्टार व लव आजकल यासारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आता इम्तियाज अली आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आला आहे. आता तो बायोपिक बनवण्याचा निर्णय घेतला आहे.


इम्तियाज अलीने बेगम मुमताज जेहान देहलवी म्हणजे मधुबालाच्या जीवनावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाचे अधिकारदेखील त्याला मिळाले आहेत. अद्याप हे समजू शकलेलं नाही की हा चित्रपट असेल की वेबसीरिज.


मधुबालाने बसंत चित्रपटातून बालकलाकार म्हणून एन्ट्री केली होती. याशिवाय तिने राज कपूरसोबत नील कमल चित्रपटातही काम केलं होतं. आता इम्तियाज मधुबालाचे जीवन रुपेरी पडद्यावर रेखाटणार आहे. 


मधुबालाच्या कुटुंबाकडून अधिकार घेतल्यानंतर इम्तियाजने स्पष्ट केलं की चित्रपटात काही वेगळं दाखवलं जाणार नाही.


अद्याप चित्रपटातील स्टारकास्टबाबतचा खुलासा झालेला नाही. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्री प्रियंका कंडवाल म्हणजेच टिक टॉकवरील फेमस मधुबाला या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसू शकते. जेव्हा मधुबालाची बहिण मधुर ब्रिज भूषण यांना करीना कपूरला मुख्य भूमिकेत पहायचे आहे.


तमाशा चित्रपटाच्या शूटिंगवेळी दीपिका पादुकोण व रणबीर कपूरचं ब्रेकअप झालं होतं. अशा परिस्थितीत कलाकारांसोबत शूटिंग करणं चॅलेजिंग असतं का, असं विचारल्यावर इम्तियाज अली म्हणाला, जोपर्यंत माझ्या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं होतं तोपर्यंत त्यांच्यातील सर्व काही संपून बराच कालावधी लोटला होता. याशिवाय काम करताना कलाकारांचे स्वार्थी उद्दिष्टं असते कारण त्यांचं काम चांगलं व्हावं.

Web Title: Imtiaz Ali to make biopic on Madhubala, this Tik Tok girl will be seen in this role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.