धर्मेंद्र यांच्याशी नाही तर हेमा मालिनी यांचे होणार होते या अभिनेत्याशी लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 09:00 PM2020-05-24T21:00:00+5:302020-05-24T21:00:00+5:30

हेमा मालिनी यांच्या आईने या अभिनेत्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. तोच आपल्या मुलीसाठी योग्य आहेत असे हेमामालिनी यांची आई जया चक्रवर्ती यांचे म्हणणे होते.

Hema Malini's wedding proposal rejected by Girish Karnad TJL | धर्मेंद्र यांच्याशी नाही तर हेमा मालिनी यांचे होणार होते या अभिनेत्याशी लग्न

धर्मेंद्र यांच्याशी नाही तर हेमा मालिनी यांचे होणार होते या अभिनेत्याशी लग्न

googlenewsNext

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्याचे स्वप्न कोणाचे नसेल ? पण, ज्येष्ठ अभिनेते व लेखक गिरीश कर्नाड यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव स्वतःहून फेटाळला होता. उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेल्या गिरीश कर्नाड यांच्या आत्मचरित्रात याबद्दल सांगितले आहे.


१९७४-७५ साली गिरीश कर्नाड पुण्यातील FTII संस्थेचे अध्यक्ष होते. त्याचवेळेस त्यांच्याकडे हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव आला होता. गिरीश कर्नाड आणि हेमा मालिनी यांचे लग्न व्हावे अशी हेमा मालिनी यांच्या आईची इच्छा होती. सत्तरच्या दशकात सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये हेमा मालिनी यांची गणना केली जात असे. संजीव कुमार, धर्मेंद्र यांसारखे अभिनेते त्यांच्या सौंदर्यावर फिदा झाले होते. पण हेमा मालिनी यांनी या अभिनेत्यांसोबत लग्न न करता गिरीश कर्नाड यांच्यासोबत लग्न करावे असे हेमा मालिनी यांच्या आईला वाटत होते.

हेमामालिनी यांच्या आईने गिरीश कर्नाड यांच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव देखील ठेवला होता. गिरीश आपल्या मुलीसाठी योग्य आहेत असे हेमामालिनी यांची आई जया चक्रवर्ती यांचे म्हणणे होते. या लग्नाच्या प्रस्तावाविषयी गिरीश कर्नाड यांनीच सांगितले होते.



गिरीश आणि हेमा यांचे लग्न व्हावे असे हेमा यांच्या आईला वाटत असले तरी हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या होत्या. काहीही करून धर्मेंद्र यांच्यासोबतच लग्न करायचे असे त्यांनी ठरवले होते. या घटनेनंतर काहीच वर्षांत धर्मेंद्र आणि हेमा यांनी लग्न केले.

धर्मेंद्र यांचे हे दुसरे लग्न होते. प्रकाश कौर यांच्यासोबत धर्मेंद्र यांचे पहिले लग्न झाले होते आणि त्यांना मुलं देखील होती.

Web Title: Hema Malini's wedding proposal rejected by Girish Karnad TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.