Gehraiyaan Trailer : दीपिका पादुकोण झाली भलतीच बोल्ड! ‘गहराइयां’चा ट्रेलर पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 06:02 PM2022-01-20T18:02:17+5:302022-01-20T18:05:43+5:30

Gehraiyaan Trailer :लव्ह, रोमान्स आणि बरंच काही...!! ट्रेलरमध्ये दीपिका पादुकोण व सिद्धांत चतुर्वेदीने कधी नव्हे इतके बोल्ड सीन्स दिले आहेत.

Gehraiyaan trailer out Deepika Padukone-Siddhant Chaturvedi’s romance | Gehraiyaan Trailer : दीपिका पादुकोण झाली भलतीच बोल्ड! ‘गहराइयां’चा ट्रेलर पाहिलात का?

Gehraiyaan Trailer : दीपिका पादुकोण झाली भलतीच बोल्ड! ‘गहराइयां’चा ट्रेलर पाहिलात का?

googlenewsNext

दीपिका पादुकोणचे  (Deepika Padukone) फॅन्स दीर्घकाळापासून ‘गहराइयां’ या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.  येत्या 11 फेबु्रवारीला अ‍ॅमेझॉन प्राईमवर हा सिनेमा रिलीज होतोय. पण त्याआधी या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर (Gehraiyaan Trailer ) रिलीज झालाये आणि रिलीज होताच, सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

शकुन बत्रा दिग्दर्शित ‘गहराइयां’ हा एक रिलेशनशिप ड्रामा आहे. आजच्या जगातील तरूणाईची स्वच्छंद जगण्याची उर्मी आणि यादरम्यानची नात्यांची गुंतागुंत हे सगळं या ट्रेलरमध्ये अतिशय प्रभावीपणे मांडलं आहे.

या चित्रपटात दीपिकाने अलिशाची भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत अनन्या पांडे  (Ananya Panday) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi ) लीड रोलमध्ये आहेत. याशिवाय धैर्य करवा, नसीरूद्दीन शाह, रजत कपूर हेही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
‘मुझे घर में रहना पसंद नहीं है, मैं यहां खुद फंसी महसूस करती हूं,’असं दीपिका म्हणते. यानंतर चुलत बहिणीच्याच बॉयफे्रन्डच्या प्रेमात वेडी झालेली दीपिका दिसते. ट्रेलरमध्ये दीपिका, अनन्या व सिद्धांतचा लव्ह ट्रँगल पाहायला मिळतो. दीपिका व सिद्धार्थचे अनेक बोल्ड लव्ह मेकिंग सीन्स ट्रेलरमध्ये आहेत. 

सोशल मीडियावर हा ट्रेलर पाहून चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दीपिका पादुकोण आणि सिद्धांतचे बोल्ड सीन्स पाहून प्रेक्षक सैराट झाले आहेत.
दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुवेर्दी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.  सिद्धांतने याआधी दीपिकाचा पती आणि बॉलिवूड स्टार रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर केली आहे. सिद्धांतने रणवीर सिंगसोबत ‘गली बॉय’ या चित्रपटात काम केलं होतं. आता सिद्धांत दीपिका सोबत दिसणार असल्याने हा चित्रपट त्याच्यासाठी आणखी खास ठरणार आहे.

Web Title: Gehraiyaan trailer out Deepika Padukone-Siddhant Chaturvedi’s romance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.