Gandii Baat 2 actress Anveshi Jain’s parents were DISAPPOINTED with her for doing Bold scens | 'या' अभिनेत्रीला सिनेमात बोल्ड सीन दिल्यामुळे घरच्यांनी धक्के मारत काढले होते घराबाहेर….

'या' अभिनेत्रीला सिनेमात बोल्ड सीन दिल्यामुळे घरच्यांनी धक्के मारत काढले होते घराबाहेर….

सध्या वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवर अनेक वेबसीरीज बघतात. अनेक चांगल्या हिंदी वेबसीरीज लोकप्रियही झाल्या आहेत. पण जास्तीत जास्त वेबसीरीजमधून बोल्ड सीन्सचा भडीमार अधिक होताना दिसतो. अनेक नवीन अभिनेत्री हे बोल्ड सीन करताना दिसतात. यातील एक नाव म्हणजे अभिनेत्री अन्वेशी जैन. अन्वेशी ही 'गंदीबात' सीरीजमध्ये दिसली होती. यातील बोल्ड सीन पाहूनच तिला तिच्या घरातील लोकांनी घराबाहेर काढलं होतं. याचा खुलासा तिने स्वत: एका मुलाखतीत केला होता.

अन्वेशी जैन या अभिनेत्रीला सध्या कुठल्याच परिचयाची गरज नाही. कारण ती नेहमी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. बोल्ड फोटोज आणि व्हिडीओ टाकून ती फॅन्सचं मनोरंजन करत असते. एका मुलाखती दरम्यान अन्वेषीने सांगितले की,’गंदी बात चित्रपटातील अश्लील सिन दिल्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला घराबाहेर काढले होते’.

अन्वेशी म्हणाली की, 'गंदी बात’च्या रिलीजच्या वेळी माझा असा विश्वास होता की सीरीज माझ्या शहरात दिसणार नाही किंवा माझ्या कुटुंबाला या चित्रपटाबद्दल समजणार नाही. परंतु माझ्या कुटुंबास कळले. त्यानंतर मला माझ्या कुटुंबातील सदस्यांचा फोन आला. ते माझ्याशी याविषयी बोलू लागले तेव्हा मी खूप रडू लागली. मी नंतर बोलते म्हणून फोन ठेवून दिला'.

अन्वेषीने पुढे सांगितले होते की, ‘दुसर्‍याच दिवशी मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना एक-पानाचे पत्र लिहिले. ज्याचे त्यांनी उत्तर दिले नाही. मी त्यांना नेहमीच पत्र लिहायचे. पण त्यांच्याकडून कोणत्याही पत्राचं उत्तर आलं नाही.मी त्यांना लिहिलेलं शेवटचं पत्र पाच पानांच होतं. ज्यात मी त्यांना माझी परिस्थिती आणि अडचणीबद्दल सांगितले'.

मी त्या पत्राद्वारे त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला होता की, मी मुंबईत दोन वर्षे किती अडचणीत घालवले आहेत. अखेरीस त्यांनी माझे ऐकण्याचे मान्य केले. त्यानंतर आम्ही बोललो आणि त्यांनी माझं सगळं ऐकून घेतलं. तेव्हा कुठे सगळं ठिक झालं.

अभिनेत्री अन्वेशी एक मॉडेल आणि शो होस्ट देखील आहे. अन्वेशीने भोपाळच्या राजीव गांधी तंत्रज्ञान विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी घेतली आहे. अन्वेशी जैन लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अन्वेशी आता एका गुजराती सिनेमातून डेब्यू करण्याची तयारी करत आहे.

हे पण वाचा :

 मिनिषा लांबाचा घटस्फोट; दोन वर्षांआधी पतीपासून झाली होती वेगळी, आत्ताकुठे केले कन्फर्म

Hotness Overloaded!! मालविका मोहननने केले बोल्ड फोटोशूट, फोटोंवरून हटणार नाही नजर

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Gandii Baat 2 actress Anveshi Jain’s parents were DISAPPOINTED with her for doing Bold scens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.