Hotness Overloaded!! मालविका मोहननने केले बोल्ड फोटोशूट, फोटोंवरून हटणार नाही नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 01:55 PM2020-08-02T13:55:22+5:302020-08-02T14:02:16+5:30

‘बियॉन्ड द क्लाऊड्स’ या सिनेमातून डेब्यू करणारी बॉलिवूड अभिनेत्री मालविका मोहनन हिचे बोल्ड फोटोशूट सध्या चर्चेत आहेत.

मालविका ही सुप्रसिद्ध सिनेमेटोग्राफर के यू मोहनन यांची लाडकी लेक आणि मल्याळम चित्रपटांची एक लोकप्रीय अभिनेत्री आहे.

मालविका सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते.

फॅशन सेन्स आणि स्टाईलसाठी ओळखली जाणारी मालविका प्रचंड ग्लॅमरस आहे.

भटकंती करायची आवड असलेली मालिकाच्या हॉलीडे ट्रिपचे फोटोही अनेकदा व्हायरल होतात.

सध्या तिचे हे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मालविकाने सन २०१३मध्ये मल्याळम चित्रपटाद्वारे अँक्टिंग डेब्यू केला होता. या चित्रपटाचे नाव आहे ‘नानू मट्टू वरलक्ष्मी’

‘बियॉन्ड द क्लाऊड्स’ या माजिद मजिदी यांच्या चित्रपटात मालविका मोहनन ही इशान खट्टरच्या बहिणीच्या भूमिकेत दिसली होती.

काही दिवसांपूर्वी मालविकाचे नाव विकी कौशलसोबत जोडले गेले होते.

विकीचे हरलीन शेट्टीसोबत ब्रेकअप झाल्यावर त्याच्या आयुष्यात मालविकाने एन्ट्री घेतल्याची चर्चा होती.