ठळक मुद्दे 2005 साली मिनिषाने सुजीत सरकारचा ‘यहां’ सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

गेल्या 5 वर्षांपासून बॉलिवूडमधून गायब असलेली अभिनेत्री मिनिषा लांबा अचानक चर्चेत आली आहे. होय, मिनिषाचा घटस्फोट झालाय. हा घटस्फोट कधी झाला, हे ठाऊक नाही. पण घटस्फोट झाल्याचे आत्ता कुठे मिनिषाने कन्फर्म केले आहे.
गेल्या 2 वर्षांपासून मिनिषा तिचा पती रायन थामपासून वेगळी राहत होती. मात्र तिने याबद्दल कुठलाही खुलासा केला नव्हता. 6 जुलै 2015 रोजी मिनिषा व  रायन लग्नबंधनात अडकले होते. गुपचूप उरकलेल्या लग्नसोहळ्यात अगदी मोजके लोक उपस्थित होते.

लग्नाचे फोटो समोर आले तेव्हा कुठे मिनिषाने लग्न केल्याचे लोकांना कळले होते. 2018 मध्ये मिनिषा व  रायन यांच्यात बिनसल्याच्या बातम्या येत होत्या. मिनिषा पतीपासून वेगळी राहत असल्याच्याही चर्चा होत्या. मात्र मिनिषाने यावर बोलणे टाळले होते. मात्र आत्ताकुठे तिने तिचा घटस्फोट झाल्याचे जाहीर केले आहे.

मिनिषा व  रायनची भेट मुंबईच्या एका नाईट क्लबमध्ये झाली होती. 2013 मध्ये दोघे पहिल्यांदा भेटले होते. यानंतर दोन वर्षे दोघे एकमेकांना डेट करत होते. 2015 मध्ये त्यांनी लग्न केले होते.

 2005 साली मिनिषाने सुजीत सरकारचा ‘यहां’ सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर  कॉपोर्रेट, हनीमून ट्रेवल्स प्राइवेट लिमिटेड  आणि  दस कहानियां  सारख्या सिनेमांतही ती झळकली. मात्र तिला खरी ओळख मिळवून दिली ती  2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बचना ए हसीनों’ सिनेमाने.  2017 मध्ये प्रदर्शित  भूमी  हा तिचा अखेरचा सिनेमात ती झळकली. यानंतर तिचा एकही सिनेमा प्रदर्शित झालेला नाही.
 मिनिषाने फेशिअल सर्जरी केली होती. त्यामुळे तिचा पूर्ण लूक बदलला होता. प्लास्टीक सर्जरी करण्यापूर्वीचा तिचा सिनेमातला लूक आणि त्यानंतरचा लूकमध्ये पाहून अनेकांना धक्का बसला होता. यानंतरच्या काळात मिनिषाला चांगल्या आॅफर्स मिळणे बंद झाल्या.  मिनिषा सिनेसृष्टीपासून कधी दुरावली हे तिलाच कळाले नाही. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: confirm actress minissha lamba ends her marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.