ठळक मुद्दे2017 मध्ये वयाच्या 45 व्या वर्षी सोनमने पुड्डचेरीचा डॉक्टर मुरली पोडुवलसोबत दुसरे लग्न केले.

‘ओए ओए गर्ल’ नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. 90 च्या दशकात एक बोल्ड अ‍ॅक्ट्रेस अशी तिची ओळख होती.  तिला साईन करण्यासाठी निर्मात्यांच्या रांगा लागायच्या. त्या काळात हिरोईन बिकिनी घालण्यास नकार देत. एखादी अभिनेत्री बिकिनीत पडद्यावर दिसलीच तर त्याची हेडलाईन होई. पण सोनमने कधीच याची पर्वा केली नाही. तिचे खरे नाव होते बख्तावर मुराद खान.  

वयाच्या 14 व्या वर्षी  ‘विजय’ या चित्रपटापासून सोनमने आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात सोनमने जबरदस्त किसींग सीन्स दिलेत आणि बोल्ड अभिनेत्री अशी तिची इमेज बनली. सोनमच्या पहिल्याच चित्रपटाने धुमाकूळ घातला. ‘विजय’ आणि ‘त्रिदेव’ या चित्रपटाने सोनमला एका रात्रीत स्टार केले. 

सोनमचा  पहिलाच सिनेमा यशराज बॅनरचा होता. शिवाय अनिल कपूर, ऋषी कपूर, मिनाक्षी शेषांद्री, राजेश खन्ना, हेमा मालिनी हे दिग्गज कलाकार या सिनेमात तिच्यासोबत होते. 1989 मध्ये त्रिदेवमध्ये तिची जोडी नसीरुद्दीन शहाबरोबर जमली. त्यावेळी सोनम 17 वर्षांची तर नसीरुद्दीन शहा 38 वर्षांचे होते.

 ‘त्रिदेव’मधील तिच्यावर चित्रीत ‘ओए ओए’ हे गाणे इतके गाजले की, या गाण्यानंतर सोनमला ‘ओए ओए गर्ल’ म्हणून ओळखले जाऊ लागले. या चित्रपटानंतर वर्षभराने सोनमचा ‘मिट्टी और सोना’ हा सिनेमा रिलीज झाला. यात तिच्या हिरो होता चंकी पांडे. पण चंकी पांडेकडे कुणाचेच लक्ष गेले नाही. कारण होते सोनमचे बोल्ड सीन्स. यात तिने काही न्यूड सीन्सही दिलेत. या सीन्सची कधी नव्हे इतकी चर्चा झाली. असे म्हणतात की, लोक तासन् तास उभे राहत या चित्रपटाचे तिकिट खरेदी करत आणि सोनमचे बोल्ड सीन्स पाहिल्यानंतर सिनेमागृहातून निघून जात. म्हणजेच लोक केवळ सोनमचे बोल्ड सीन्स पाहण्यासाठी येत आणि सीन्स संपले की अख्खे सिनेमागृह रिकामे होई.

आपल्या करिअरमध्ये सोनमने 25 चित्रपटांत काम केले आणि 19 व्या वर्षी स्वत:पेक्षा 17 वर्षे मोठ्या दिग्दर्शकाशी लग्न केले. राजीव राय या दिग्दर्शकाचे नाव. त्रिदेवच्या सेटवर राजीव व सोनमची लव्ह स्टोरी सुरु झाली होती. 1991 मध्ये दोघांनी लग्न केले. पण 10 वर्षे एकत्र राहिल्यानंतर सोनमने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 15 वर्षे विभक्त राहिल्यानंतर 2016 मध्ये तिने घटस्फोट घेतला.

 2017 मध्ये वयाच्या 45 व्या वर्षी सोनमने पुड्डचेरीचा डॉक्टर मुरली पोडुवलसोबत दुसरे लग्न केले.
 


Web Title: flashback actress sonam bold scenes famous in 90s
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.