VIDEO : 'मैं आई हूं यूपी बिहार लूटने..!' लाल साडीतील शिल्पा शेट्टीचे लटके झटके पाहून फॅन्स झाले क्लीन बोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 15:54 IST2021-02-11T15:54:11+5:302021-02-11T15:54:47+5:30
शिल्पा शेट्टीच्या लाल साडीतील अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

VIDEO : 'मैं आई हूं यूपी बिहार लूटने..!' लाल साडीतील शिल्पा शेट्टीचे लटके झटके पाहून फॅन्स झाले क्लीन बोल्ड
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी बऱ्याचदा तिच्या फिटनेस आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. नुकतेच शिल्पा शेट्टीने मुंबईत लाल साडीत ग्लॅमरस अदा दाखवल्या ज्या पाहून लोक घायाळ झाले आहेत. ज्या प्रकारे अभिनेत्रीने मैं आई हूं यूपी बिहार लुटने या गाण्यात ठुमके लगावून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते तसाच अंदाज तिचा नुकताच पहायला मिळाला.
मुंबईत शूटिंग दरम्यान शिल्पाने नुकताच सेक्सी अवतार घेतला होता. त्यावेळी तिने लाल रंगाची साडी परिधान केली होती. तिने साडीवर बेल्ट लावला होता, जो साडीला चारचाँद लावत होता. डोक्याला टिक्का आणि गळ्यात मॅचिंग हार यामुळे त्याच्या सौंदर्याला चारचाँद लागले होते. शिल्पाने जेव्हा पॅपराझीला पाहून आपला पदर हलवून पोझ दिले. त्यावेळी तिच्या अदा पाहून सगळे थक्क झाले होते. तिचे या गेटअपमधील फोटो पाहून तिचे चाहते क्लीन बोल्ड झाले आहेत.
बऱ्याच कालावधीपासून शिल्पा शेट्टी रुपेरी पडद्यापासून लांब आहे. आता ती हंगामा २ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करते आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.
हंगामा २ चित्रपट हंगामा फ्रेंझाइजीचा दुसरा चित्रपट आहे. जो २००३ साली रिलीज झाला होता. त्याच्या सीक्वलच्या शूटिंगची सुरूवात मागील वर्षात झाली होती. मात्र लॉकडाउनमुळे शूटिंग थांबले होते. अनलॉक झाल्यानंतर शिल्पा शेट्टीसोबत इतर कलाकारांनी हंगामा २चे शूटिंग संपवले आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिल्पाचे चाहते तिला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.