Did you know? Sanjay Dutt wasn't the original choice for Khalnayak | 'खलनायक'मधील बल्लूच्या भूमिकेसाठी संजय दत्त नाही तर 'हा' मराठी अभिनेता होता पहिली पसंत!

'खलनायक'मधील बल्लूच्या भूमिकेसाठी संजय दत्त नाही तर 'हा' मराठी अभिनेता होता पहिली पसंत!

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे इतर कामांसोबतच बॉलिवूडची कामेही बंद होती. आता कुठे हळूहळू कामे सुरू होत आहेत. पण बॉलिवूडचे शोमन म्हणून लोकप्रिय असलेल दिग्दर्शक सुभाष घई हे लॉकडाऊनमध्येही  दोन सिनेमांवर करत आहेत. एक म्हणजे 'खलनायक' चा सीक्वेल आणि दुसरा 'कालीचरण' चा रिमेक. दोन्ही सिनेमांच्या स्क्रीप्ट रेडी झाल्या आहेत.

'कालीचरण' हा सुभाष घई यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा होता तर खलनायक त्यांच्या करिअरमधील फार महत्वाचा सिनेमा. या सिनेमांची स्क्रीप्ट तयार असल्याचे सुभाच घई यांनी सांगितले होते. इतकेच नाही तर संजय दत्त हा खलनायकमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. यातील बल्लूची भूमिका संजयने अफलातून साकारली आहे. आजही खलनायक म्हटलं की, लोकांना संजय दत्तची ही भूमिका आठवते. पण अनेकांना या भूमिकेची एक मजेदार बाब माहीत नाही.

संजय दत्त हा प्रत्यक्षात बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी तुरूंगात होता. त्यानंतर बाहेर आल्यावर त्याचं करिअर याच खलनायक सिनेमाने रूळावर आणलं होतं. त्याने ही भूमिका कमाल साकारली होती. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही की, या भूमिकेसाठी सुभाष घई यांची पहिली पसंत संजय दत्त नव्हताच. मुळात ही भूमिका दुसराच अभिनेता साकारणार होता. पण वेळेवर ही भूमिका संजयकडे आली. 

यातील सिनेमात जॅकी श्रॉफ आणि माधुरीची भूमिका आधीच ठरली होती. सुभाष घई यांनी सांगितले होते की, संजय दत्तने साकारलेल्या बल्लू या भूमिकेसाठी संजय नाही तर नाना पाटेकर हे त्यांची पहिली पसंत होते. त्यांना जॅकी आणि नाना पाटेकर अशी जोडी खलनायकमध्ये घ्यायची होती. पण नंतर संजय दत्तने ही भूमिका साकारली.

हे पण वाचा :

सुरेश वाडकरांनी नाकारले होते चक्क ‘धकधक गर्ल ’ माधुरी दीक्षितचे स्थळ, कारण ऐकून व्हाल थक्क

बॉलिवूडच्या 'या' सिनेमात मोठा झाल्यावर सोनू निगम बनला होता सनी देओल...

शाहिद कपूरला पसंत नव्हती करिना कपूरसोबत त्याची जोडी, ब्रेकअपनंतर केला धक्कादायक खुलासा

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Did you know? Sanjay Dutt wasn't the original choice for Khalnayak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.