बॉलिवूडच्या 'या' सिनेमात मोठा झाल्यावर सोनू निगम बनला होता सनी देओल...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 11:25 AM2020-08-07T11:25:54+5:302020-08-07T12:02:15+5:30

बेताब हा सनी देओल आणि अमृता सिंह दोघांचाही डेब्यू सिनेमा होता. यातील दोघांचा किसींग सीनही गाजला होता. सनी देओल हा त्याच्या दोन्ही सिनेमात सनी नावाच्या भूमिकाच साकारल्या होत्या.

Sunny Deol and Amrita Singh film betaab completed 37 years, Sonu Nigham played child artist | बॉलिवूडच्या 'या' सिनेमात मोठा झाल्यावर सोनू निगम बनला होता सनी देओल...

बॉलिवूडच्या 'या' सिनेमात मोठा झाल्यावर सोनू निगम बनला होता सनी देओल...

googlenewsNext

सनी देओलचा सिनेमा 'बेताब' रिलीजला आ ३७ वर्षे झाले आहे. या सिनेमात सनी देओल आणि अमृती सिंह मुख्य भूमिकेत होते. सिनेमा चांगलाच चालला होता. या सिनेमातील एक महत्वाची बाब म्हणजे या सिनेमात गायक सोनू निगमनेही महत्वाची भूमिका साकारली होती. चला जाणून घेऊ सिनेमाबाबत काही खास गोष्टी....

बेताब हा सनी देओल आणि अमृता सिंह दोघांचाही डेब्यू सिनेमा होता. यातील दोघांचा किसींग सीनही गाजला होता. सनी देओल हा त्याच्या दोन्ही सिनेमात सनी नावाच्या भूमिकाच साकारल्या होत्या. दुसरी बाब म्हणजे त्याच्या सुरूवातीच्या दोन्ही सिनेमात अमृता सिंह हीच अभिनेत्री होती. 

सनी देओलने बेताब पूर्ण करण्याआधीच सनी, सोहनी महिवाल, मंजिल मंजिल, जबरदस्तसारखे सिनेमे साइन केले होते. अनेकांना माहीत नाही की, बेताबमध्ये गायक सोनू निगमने बाल कलाकार म्हणून काम केलं होतं. त्याने सनी देओलच्या बालपणीची भूमिका साकारली होती.

हा सिनेमा लिहिला होता जावेद अख्तर यांनी. त्यांचा स्वतंत्रपणे लिहिलेला हा पहिला सिनेमा होता. तर डेविड धवनने एडिटींग केलं होतं. या सिनेमाला आधी मंदाकिनी, मिनाक्षी शेषाद्रीने नकार दिला होता. त्यानंतर अमृता सिंहला संधी मिळाली. धर्मेंद्र यांनी लव्ह स्टोरी सिनेमा पाहिल्यावर सनी देओलला लॉन्च करण्यासाठी राहुल रवैलला डायरेक्टर म्हणून फायनल केले होते.

हे  पण वाचा :

सुरेश वाडकरांनी नाकारले होते चक्क ‘धकधक गर्ल ’ माधुरी दीक्षितचे स्थळ, कारण ऐकून व्हाल थक्क

सत्य घटनेने प्रेरीत असलेला 'खुदा हाफिज' - फारुख कबीर

Web Title: Sunny Deol and Amrita Singh film betaab completed 37 years, Sonu Nigham played child artist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.