ठळक मुद्देसनी देओलची पत्नी पूजा देओल ही सुद्धा मुलाच्या पहिल्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचली.

सनी देओलचा मुलगा करण देओलचा पहिलावहिला ‘पल पल दिल के पास’ हा सिनेमा आज प्रदर्शित झाला. त्यापूर्वी काल या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या स्पेशल स्क्रिनिंगला बॉलिवूडच्या अनेकांनी हजेरी लावली. यादरम्यान एका चेह-याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा चेहरा कुणाचा तर धर्मेन्द्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांचा.
देओल कुटुंबाच्या तिस-या पिढीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केलीय. अर्थातच संपूर्ण देओल कुटुंबासाठी हा खास क्षण आहे. त्यामुळेच संपूर्ण देओल कुटुंब करणच्या पाठीशी उभे असलेले दिसतेय. धर्मेन्द्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर याही नातवाचा पहिला चित्रपट पाहायला पोहोचल्या.

प्रकाश कौर क्वचित कुठल्या कार्यक्रमाला दिसतात. पण नातव्याचा चित्रपट पाहायला मात्र त्या आवर्जून आल्या. यादरम्यान त्या अतिशय सिंपल लूकमध्ये दिसल्या.
धर्मेन्द्र यांनीही या स्क्रिनिंगला हजेरी लावली. अर्थात ते व प्रकाश कौर दोघेही वेगवेगळे आलेत. धर्मेन्द्र यांचे पहिले लग्न वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी झाले होते. धर्मेन्द्र यांनी 1954 मध्ये प्रकाश कौर यांच्याशी लग्न केले होते. दोघांना सनी, बॉबी, विजेता व अजिता अशी चार मुले आहेत.

1980 मध्ये बॉलिवूडचे ‘हीमॅन’ अर्थातच  धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरे लग्न थाटले होते. दोघांना धर्म बदलून लग्न करावे लागले होते. याचे कारण म्हणजे धर्मेन्द्र विवाहित होते. होय, धर्मेन्द्र यांनी त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देताच हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केले होते.

हेमासोबत लग्न करण्यासाठी धर्मेन्द्र यांना प्रकाश यांच्याकडून घटस्फोट घ्यायचा होता. पण प्रकाश काहीही केल्या त्यांना घटस्फोट द्यायला तयार नव्हत्या. पण धर्मेन्द्र्र हेमा यांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते आणि काहीही करून त्यांच्यासोबत लग्न करायचे त्यांनी ठरवले होते. त्या काळात प्रकाश या पूर्णपणे कोलमडून गेल्या होत्या एका साध्या गावातील सामान्य महिला असल्या तरी त्यांनी धैर्याने सगळ्या गोष्टींना तोंड दिले. 

सनी देओलची पत्नी पूजा देओल

सनी देओलची पत्नी पूजा देओल ही सुद्धा मुलाच्या पहिल्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचली. ‘बेताब’ हा पहिला चित्रपट रिलीज होण्याआधी सनीचे पूजाशी लग्न झाले होते. पण सनीने अनेक वर्षे लग्न झाल्याची बातमी जगापासून लपवून ठेवली होती. 

Web Title: dharmendra ex-wife prakash kaur attend grandson film pal pal dil ke paas movie screening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.