बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री दीपिका पादुकोण भलेही यांच्या वाटा आता वेगळ्या असल्या तरी एकेकाळी ते बॉलिवूडमधील बेस्ट कपल होते. त्या दोघांमध्ये खूप चांगले बॉडिंग होते. दोघे नेहमी एकत्र दिसायचे. पण त्यांचे ब्रेकअप झाले आणि दीपिकाने रणवीर सिंगसोबत लग्न केले.

रणबीर कपूरदीपिका पादुकोण यांच्या फिल्मी करियरबद्दल सांगायचे तर त्या दोघांनी एकत्र कित्येक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातील एक चित्रपट म्हणजे ये जवानी है दीवानी. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली. तुम्ही विचार करत असाल ना की आम्ही आता या चित्रपटाबद्दल का बोलतो आहे. आम्ही या चित्रपटाबद्दल आता सांगतो आहोत कारण हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल सहा वर्ष उलटली आहेत. ३१ मे, २०१३ रोजी प्रदर्शित झाला होता.


या निमित्ताने रणबीर व दीपिकाचा एक जबरदस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात ते दोघे डान्स करताना दिसत आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये दीपिकाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर रणबीरने ब्लॅक अॅण्ड व्हाईट रंगाच थ्री पीस सूट घातला आहे आणि ते दोघे कोणत्या तरी व्हॅनिटी व्हॅनमध्ये डान्स करत आहेत. ते दोघे ज्या गाण्यावर डान्स करत आहेत ते गाणे ये जवानी है दिवानीमधील बलम पिचकारी हे आहे.

हा व्हिडिओ यावर्षी पार पडलेल्या स्टार स्क्रीन पुरस्कार सोहळ्यानंतर व्हॅनिटी व्हॅनमध्ये शूट केला गेला. यावेळी व्हॅनिटी व्हॅनमध्ये रणवीर सिंग, आलिया भट व विकी कौशल उपस्थित होते. यावेळी दीपिकाला डान्ससाठी प्रोत्साहन देत रणवीर सिंग या बेबी असे ओरडत आहे.


 
दोघांच्या कामाबद्दल सांगायचे तर सध्या दीपिका आगामी चित्रपट छपाकच्या चित्रीकरणात व्यग्र आहे तर रणबीर कपूर ब्रह्मास्त्रच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.


Web Title: deepika-padukone-ranbir-kapoor-dance-on-balam-pichkari-makes-ranveer-singh-shout-yeah-baby-watch-
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.