‘ओम शांती ओम’वेळी अनेकांनी उडवली होती दीपिका पादुकोणची खिल्ली...!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 08:00 AM2020-12-30T08:00:00+5:302020-12-30T08:00:02+5:30

दीपिकाला आजही छळतात ते शब्द..

deepika padukone open up on being trolled over her accent by people after her first film om shanti om | ‘ओम शांती ओम’वेळी अनेकांनी उडवली होती दीपिका पादुकोणची खिल्ली...!

‘ओम शांती ओम’वेळी अनेकांनी उडवली होती दीपिका पादुकोणची खिल्ली...!

googlenewsNext
ठळक मुद्देपहिल्याच सिनेमात दीपिकाला शाहरूखसारख्या सुपरस्टारसोबत काम करण्याची संधी मिळाली. शिवाय पहिलाच सिनेमा सुपरहिटही झाला.

दीपिका पादुकोण आज बॉलिवूडच्या लीडिंग लेडीच्या यादीत अव्वल स्थानी आहे.  मॉडेलिंगपासून सुरुवात करणारी दीपिका आज बॉलिवूडची टॉप अ‍ॅक्ट्रेस म्हणून ओळखली जाते. अर्थात हा पल्ला गाठण्यासाठी तिला बराच मोठा संघर्ष करावा लागला. अगदी बॉलिवूडमध्ये नवखी असताना तिने लोकांच्या टिंगल-टवाळक्या सहन केला. तिच्या भाषेचीही खिल्ली उडवली गेली.
होय, एका ताज्या मुलाखतीत दीपिका यावर बोलली. दीपिकाने ‘ओम शांती ओम’ या सिनेमातून डेब्यू केला होता. 2007 साली रिलीज झालेला हा तिचा पहिला सिनेमा होता.

पहिल्याच सिनेमात दीपिकाला शाहरूखसारख्या सुपरस्टारसोबत काम करण्याची संधी मिळाली. शिवाय पहिलाच सिनेमा सुपरहिटही झाला. या गोष्टीचा तिला आनंद होताच. पण आतून ती दु:खी होती. कारण असे काही लोक होते, ज्यांनी दीपिकावर तिखट शब्दांत टीका केली होती. 

दीपिकाने सांगितले, ‘मॉडेलिंगमध्ये काही वर्षे घालवल्यानंतर मला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळाला. ओम शांती ओम हा सिनेमा मिळाला तेव्हा मी 19 वर्षांचे होते. अनेक बाबतीत कच्ची होते, अज्ञानी होते. पण शाहरूखने मला खूप मदत केली. माझा पहिलाच सिनेमा सुपरहिट झाला. पण याचवेळी काही लोक माझी खिल्ली उडवत होते. ओह, ही तर मॉडेल आहे, अ‍ॅक्टिंग हिला काय जमणार, असे टोमणे मला ऐकायला मिळत होते. माझ्या एक्सेंटचीही खिल्ली उडवली जात होती. माझ्या व माझ्या अभिनयाबद्दल मला नाही नाही ते त्यावेळी ऐकावे लागले. आजही मला त्याचे दु:ख आहे. 20 व्या वर्षी अशाप्रकारची टीका, टोमणे तुमचे आयुष्य प्रभावित करते. मात्र पुढे हीच टीका माझी प्रेरणा बनली. यामुळे माझ्या व्यक्तिमत्त्वात अनेक बदल करण्याची प्रेरणा मला मिळाली. ’ 

दीपिकाने ‘ओम शांती ओम’मधून डेब्यू केला. पुढे कॉकटेल, बाजीराव मस्तानी, राम लीला, ये जवानी है दीवानी, पद्मावत असे अनेक हिट सुपरहिट सिनेमे तिने दिलेत. आज ती बॉलिवूडची लीडिंग लेडी म्हणून ओळखली जाते.

 

Web Title: deepika padukone open up on being trolled over her accent by people after her first film om shanti om

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.