deepika padukone meets luv ranjan and fans trolled not my deepika | का नाराज झालेत दीपिका पादुकोणचे चाहते? का ट्रेंड होतोय #NotMyDeepika
का नाराज झालेत दीपिका पादुकोणचे चाहते? का ट्रेंड होतोय #NotMyDeepika

ठळक मुद्देमीटू मोहिमेअंतर्गत एका अभिनेत्रीने लव रंजन यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केला होता.

दिग्दर्शक लव रंजन यांच्या चित्रपटांचा आपला एक चाहता वर्ग आहे. 2011 मध्ये लव रंजन यांनी ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. यानंतर ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ आणि ‘दे दे प्यार दे’ सारखे सुपरहिट सिनेमे दिलेत. ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने तर अनेक विक्रम तोडत 100 कोटींची कमाई केली. सध्या लव रंजन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर  हे दोघे लव रंजन यांना भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसात पोहोचले. पण यानंतर सोशल मीडियावर ‘नॉट माय दीपिका’ हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.

लव रंजन यांच्या ऑफिसबाहेर दीपिका व रणबीर एकत्र दिसताच  लव रंजन यांच्या नव्या चित्रपटात ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार अशी चर्चा सुरु झाली. पण ही बातमी येताच, दीपिकाचे चाहते नाराज झालेले दिसले आणि यानंतर सोशल मीडियावर  #NotMyDeepika ट्रेंड होऊ लागला. 

अनेक चाहत्यांनी दीपिकाला लव रंजन यांचा चित्रपट न करण्याची विनंती केली. इतकेच नाही तर अनेकांनी लव रंजनचा चित्रपट साईन केल्यास तू हजारो चाहते गमावून बसशील, असेही लिहिले.

लव रंजन आपल्या चित्रपटातील महिला विरोधी कंटेन्टसाठी ओळखले जातात. यासाठी अनेकदा त्यांच्या चित्रपटांवर टीका होते. या एका कारणामुळे दीपिका व रणबीर लव रंजन यांना भेटायला पोहोचताच चाहते नाराज झालेत. चाहते नाराज होण्यामागे एक दुसरे कारणही आहेच. ते म्हणजे, लव रंजन यांच्यावरचे गैरवर्तनाचे आरोप. 

मीटू मोहिमेअंतर्गत एका अभिनेत्रीने लव रंजन यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केला होता. 2010 मध्ये एका चित्रपटाच्या कास्टिंगदरम्यान लव रंजन यांनी  मी ब्रा आणि पॅन्टीमध्ये कशी दिसते, हे पाहण्यासाठी कपडे उतरवण्यास सांगितले होते, असा आरोप या अभिनेत्रीने केला होता. 


Web Title: deepika padukone meets luv ranjan and fans trolled not my deepika
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.