दीपिका पादुकोण बनली सर्वात महागडी अभिनेत्री, प्रभाससोबतच्या सिनेमासाठी घेतले इतके कोटी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 10:16 IST2020-07-23T10:16:06+5:302020-07-23T10:16:51+5:30

बॉलिवूडच्या  ‘मस्तानी’चा मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क

deepika padukone charge 20 crore rupees for prabhas | दीपिका पादुकोण बनली सर्वात महागडी अभिनेत्री, प्रभाससोबतच्या सिनेमासाठी घेतले इतके कोटी  

दीपिका पादुकोण बनली सर्वात महागडी अभिनेत्री, प्रभाससोबतच्या सिनेमासाठी घेतले इतके कोटी  

ठळक मुद्देयाचवर्षी सुरुवातीला दीपिकाचा ‘छपाक’ हा सिनेमा रिलीज झाला होता. मात्र या सिनेमाला अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकले नाही.

बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण ‘बाहुबली’ प्रभाससोबत झळकणार असल्याची बातमी आम्ही तुम्हाला दिलीच. आता बातमी यापुढची आहे. होय, या सिनेमासाठी दीपिकाने घेतलेल्या मानधनाची ही बातमी. दीपिकाच्या मानधनाचा हा आकडा ऐकून तुमचेही डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत. चर्चा खरी मानाल तर दीपिकाने या सिनेमासाठी 20 कोटी रूपये मानधन आकारले आहे. याचसोबत  इतके मोठे मानधन आकारणारी दीपिका भारतीय सिनेसृष्टीतील पहिली अभिनेत्री बनली होती.

केवळ दीपिकाच नाही तर प्रभासनेही या आगामी सिनेमासाठी मोठी रक्कम चार्ज केली आहे. त्याने या सिनेमासाठी 50 कोटी घेतल्याचे कळतेय.
दीपिका व प्रभासचा  हा सिनेमा प्रभासचा 21 वा सिनेमा आहे. त्यामुळे ‘प्रभास 21’ असे या सिनेमाचे नामकरण करण्यात आले आहे. दिग्दर्शक नाग अश्विन हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. या सिनेमाद्वारे तेलुगू सिनेसृष्टीत दीपिकाचा हा डेब्यू चित्रपट असणार आहे.

  दिग्दर्शक एस. एस. राजमौलींचा ‘बाहुबली’ केल्यानंतर प्रभास चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. पद्मावत, बाजीराव मस्तानी, छपाक असे सिनेमे करणारी दीपिकाही यशाच्या शिखरावर आहे. आता हे दोन्ही सुपरस्टार एकत्र येणार म्हटल्यावर चाहत्यांच्या उत्कंठता वाढली आहे.  या सिनेमाचे शूटिंग पुढील वर्षी एप्रिलमध्ये सुरू होणार असून हा सिनेमा साधारण 2022 मध्यें प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.  

याचवर्षी सुरुवातीला दीपिकाचा ‘छपाक’ हा सिनेमा रिलीज झाला होता. मात्र या सिनेमाला अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकले नाही. या सिनेमानंतर काही दिवस ब्रेक घेणार असल्याचे दीपिकाने सांगितले होते. आता मात्र दीपिका पुन्हा कामावर परतण्यास सज्ज झाली आहे. तिच्या व प्रभासच्या या सिनेमाची पे्रक्षकांना आतुरतेने प्रतीक्षा असणार आहे.

Web Title: deepika padukone charge 20 crore rupees for prabhas