ट्रोलर्स पाठ सोडेना...!! कोरोनामुक्त होऊन घरी परतलेली कनिका कपूर पुन्हा झाली ट्रोल  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 04:16 PM2020-04-06T16:16:26+5:302020-04-06T16:16:32+5:30

सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

corona virus kanika kapoor brutally trolled after she gets discharged form hospital corona virus-ram |  ट्रोलर्स पाठ सोडेना...!! कोरोनामुक्त होऊन घरी परतलेली कनिका कपूर पुन्हा झाली ट्रोल  

 ट्रोलर्स पाठ सोडेना...!! कोरोनामुक्त होऊन घरी परतलेली कनिका कपूर पुन्हा झाली ट्रोल  

googlenewsNext
ठळक मुद्देकनिका कपूर काही दिवसांपूर्वीच लंडनवरून भारतात परतली होती. 

बॉलिवूड सिंगर कनिका कपूर कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने सर्वत्र खळबळ माजली होती. पण आता 18 दिवसांच्या उपचारानंतर कनिका एकदम ठीक झाली असून तिला रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 4 एप्रिलला कनिकाची पाचवी चाचणी करण्यात आली. यात तिचा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. यानंतर तिचा सहावा रिपोर्टही निगेटीव्ह आला. यानंतर रूग्णालयातून तिला सुट्टी देण्यात आली. कनिका कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने तिचे कुटुंब आनंदात आहे. पण सोशल मीडियावरच्या काही लोकांना मात्र तिचे घरी परतणे कदाचित फारसे रूचले नाही. नेटक-यांनी तिला ट्रोल करणे सुरु केले.
कनिका पॉझिटीव्ह आढळल्यानंतर तिच्यावर निष्काळजीपणा बाळगल्याचा आरोप झाला होता. तेव्हाही ती प्रचंड ट्रोल झाली होती. आता रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही ती ट्रोल होतेय. तिच्यावरचे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात कनिकाला लक्ष्य केले जातेय.

कनिका कपूर काही दिवसांपूर्वीच लंडनवरून भारतात परतली होती.  लंडनवरुन भारतात परतल्यावर कनिकाने एक हायप्रोफाइल पार्टी सुद्धा अटेंड केली होती. ज्यात राजकीय वतुर्ळातील अनेक नेते आणि जज यांच्यासह जवळपास 300 लोक सामील झाले होते.  या  यानंतर कनिका  कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट होताच सगळ्यांचे धाबे दणाणले होते. निष्काळजीपणा बाळगून अनेकांचा जीव धोक्यात आणल्याबद्दल तिच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. तूर्तास यावरूनही कनिकाला ट्रोल केले जातेय.

पाहा, कनिकावरचे मीम्स...


 

Web Title: corona virus kanika kapoor brutally trolled after she gets discharged form hospital corona virus-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.