डायरेक्टरने कट म्हटल्यानंतरही किस करतच होते दीपिका अन् रणवीर सिंह; सेटवर अशी होती लोकांची रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 09:24 AM2021-07-27T09:24:16+5:302021-07-27T09:27:37+5:30

या दोघांचे एकमेकांवर किती प्रेम आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, एका चित्रपटावेळी हे दोघे प्रेमात असे काही बुडाले होते, की डायरेक्टरने कट म्हटल्यानंतरही या दोघांचा किसिंग सीन सुरूच होता.

Bollywood deepika padukone Ranveer Singh did not stop kissing each other, even after the director said cut | डायरेक्टरने कट म्हटल्यानंतरही किस करतच होते दीपिका अन् रणवीर सिंह; सेटवर अशी होती लोकांची रिअ‍ॅक्शन

डायरेक्टरने कट म्हटल्यानंतरही किस करतच होते दीपिका अन् रणवीर सिंह; सेटवर अशी होती लोकांची रिअ‍ॅक्शन

Next

नवी दिल्ली - बॉलीवुड अ‍ॅक्ट्रेस दीपिका पादुकोणची गणना टॉप अ‍ॅक्ट्रेसमध्ये होते. ती आज एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये फीस घेते. तिने आजवर अनेक सुपरहिट फिचित्रपट दिले आहेत. मात्र, चित्रपटांबरोबरच ती आपल्या पर्सनल लाइफमुळेही अनेक वेळा चर्चेत राहिली आहे. तिने लाँग टाइम बॉयफ्रेंड तसेच अ‍ॅक्टर रणवीर सिंह सोबत लग्न केले आहे. एवढेच नाही, तर या जोडीला बॉलिवूडमधील पावर कपल म्हणूनही ओळखले जाते. या दोघांचे एकमेकांवर किती प्रेम आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, एका चित्रपटावेळी हे दोघे प्रेमात असे काही बुडाले होते, की डायरेक्टरने कट म्हटल्यानंतरही या दोघांचा किसिंग सीन सुरूच होता. (Bollywood deepika padukone Ranveer Singh did not stop kissing each other, even after the director said cut)

कट म्हटल्यानंतरही करत होता किस -
ही घटना, ‘गोलियों की रासलीला.. रामलीला’मधील आहे. या चित्रपटात रणवीर आणि दीपिका मुख्य भूमिकेत होते. या दोघांची भूमिका असलेला पहिलाच चित्रपट होता. याच चित्रपटापासून दोघांची प्रेमाची गाडी सुरू झाली होती. या चित्रपटात दोघांचे अनेक रोमॅन्टिक सीन्स आहेत. विशेष म्हणजे, एका चित्रपटात तर दोघे कट म्हटल्यावरही किस करतच होते. यानंतरच, हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत, हे सर्वांना कळले.

क्रू मेंबरनं सांगितली संपूर्ण घटना - 
‘रामलीला’च्या एका क्रू मेंबरने हफिंगटन पोस्टशी बोलताना सांगितले होते, की ‘अंग लगा दे रे’ गाण्याच्या शुटिंगदरम्यान दोन्ही डायरेक्टर कट म्हटल्यानंतरही रणवीर आणि दीपिका किस करतच होते. क्रू मेंबरने सांगितले, 'गाण्यात या दोघांचा एक किसिंग सीन होता. सीन पूर्ण झाल्यानंतर भंसाली कट म्हणाले, मात्र, हे दोघे कट म्हटल्यानंतरही एकमेकांना किस करतच होते. त्यावेळी तेथे 50 लोक उपस्थित होते. सर्वच जण हे दृष्य पाहून हैराण झाले होते आणि तेथे एकदम शांतता निर्माण झाली होती. त्यावेळी हे दोघेही प्रेमात आहेत, हे सर्वांना समजले. दोघांचा हा सीन अत्यंत पॅशनेट होता. तेव्हा कुणीही एक शब्दही उच्चारला नव्हता. मी आजही ते दृश्य विसरू शकत नाही.’

सेटवर सोबत जेवायचो -
यानंतर, हे दोघे सेटवर कशा प्रकारे राहायचे, यावरही क्रू मेंबरने भाष्य केले आहे. त्यांनी सांगितले, 'दोघेही एकमेकांना बेबी म्हणून हाक मारायचे. सोबतच जेवायचे. शुटिंग नसेल तेव्हा दोघेही व्हॅनिटी व्हॅन घेऊन गायब व्हायचे.' दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी एकमेकांना जवळपास सहा वर्ष डेट केले. यानंतर 14 नोव्हेंबर 2018 रोजी दोघे लग्नाच्या बेडीत अडकले. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bollywood deepika padukone Ranveer Singh did not stop kissing each other, even after the director said cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app