कंगनाची टिवटिव थांबताच खुश्श झालेत हे बॉलिवूड स्टार्स; म्हणाले, जा दुसरीकडे जा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 10:25 AM2021-05-05T10:25:15+5:302021-05-05T10:26:39+5:30

 ट्विटरच्या कारवाईनंतर कंगनाची सटकलीये, पण बॉलिवूडच्या एका गटात मात्र आनंदाचे वातावरण आहे.

bollywood celebs are happy after kangana ranaut twitter account suspension | कंगनाची टिवटिव थांबताच खुश्श झालेत हे बॉलिवूड स्टार्स; म्हणाले, जा दुसरीकडे जा...

कंगनाची टिवटिव थांबताच खुश्श झालेत हे बॉलिवूड स्टार्स; म्हणाले, जा दुसरीकडे जा...

Next
ठळक मुद्देट्विटरने ‘द्वेषयुक्त आचरण आणि अपमानकारक वर्तन’ धोरणाचे उल्लंघन केल्याबद्दल कंगनाचे ट्विटर अकाउंट सस्पेंड केले.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकींच्या निकालानंतर कंगना राणौत (Kangana Ranaut) ट्विटरवर नको ते बरळली आणि यानंतर ट्विटरने तिचे अकाऊंट सस्पेंड केले. ट्विटरच्या या कारवाईनंतर कंगनाची सटकलीये, पण बॉलिवूडच्या एका गटात मात्र आनंदाचे वातावरण आहे. होय, रिचा चड्ढा, स्वरा भास्कर, गुलशन देवैया आणि हंसल मेहता यांनी कंगनाचे ट्विटर अकाऊंट सस्पेन्ड होताच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आनंद साजरा केला आहे.

रिचाने शेअर केले मीम

रिचा चड्ढाने कंगनाचे नाव घेतलेले नाही. पण एक मीम शेअर केले. तिचा इशारा लोकांनी बरोबर ओळखला. Be Yourself. Somewhere Else असा मॅसेज लिहिलेले रिचाने शेअर केलेले मीम पाहून अनेक युजरने कमेंट केल्यात. आयपीएल आणि कंगनाचे अकाऊंट सस्पेंड झाले, देशात मनोरंजनाची कमतरता... अशी मजेशीर कमेंट यावर एका युजरने केली.

स्वरा भास्करही खुश्श

स्वराने कंगनाबद्दलची एक बातमी शेअर केली. एका फॅशन हाऊसने कंगनाची हकालपट्टी केल्याची ही बातमी शेअर करत, हे पाहून आनंद झाला, असे स्वराने लिहिले.

गुलशनने घेतली मजा

अभिनेता गुलशन देवैया यानेही कंगनाचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड होताच ट्विट केले. ‘तिने आपल्याच पायांवर कु-हाड मारून घेतली. बिचारा विराट, कुठलेही कारण नसताना त्याचे नाव गोवले गेले,’ अशी मजेदार प्रतिक्रिया त्याने दिली़ काल कंगनाने एक ट्विट केले होते. त्यात तिने नरेंद्र मोदींना सन 2000 सारखे ‘विराट रूप’ दाखवण्याचे आवाहन केले होते.

हंसल मेहता म्हणाले, फुल्ल नौटंकी

दिग्दर्शक हंसल मेहता यांनी यावर प्रतिक्रिया देताना ‘फुल्ल नौटंकी’ असे ट्विट केले.

कुब्रा सैतही आनंदी...

आमीन... मी कधी तिला भेटली असतीच तर कदाचित डाव्या पायाने हाणली असती. पण हा मार्ग उत्तम आहे. तिच्याशिवाय सोशल मीडिया आणखी मस्त वाटतोय, असे ट्विट करत अभिनेत्री कुब्रा सैतने कंगनाला सुनावले.

Web Title: bollywood celebs are happy after kangana ranaut twitter account suspension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app