Bollywood celebrities support Diljit Dosanjh after he engages in war of words with Kangana Ranaut | Kangana Vs Diljit : अभिनेत्याला मिळाला बॉलिवूडचा सपोर्ट, म्हणाले - हिंदुस्तान आणि पंजाबची शान....

Kangana Vs Diljit : अभिनेत्याला मिळाला बॉलिवूडचा सपोर्ट, म्हणाले - हिंदुस्तान आणि पंजाबची शान....

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत शेतकरी आंदोलनातील एका वयोवृद्ध आजीची खिल्ली उडवल्याने अनेकांच्या निशाण्यावर आहे. अनेक पंजाबी गायक-कलाकार तिच्यावर वक्तव्याचा निषेध करत आहे. अशात ट्विटरवर यावरूनच तिच्यात आणि गायक-अभिनेता दिलजीत दोसांझसोबत वाद झाला. कंगनाने दिलजीतसाठी फारच वाईट शब्द वापरले यावरून त्याला दिलजीतला अनेक कलाकारांचा सपोर्ट मिळाला आहे. 

कंगना रनौत आणि दिलजीत दोसांझच्याट्विटर वॉरमध्ये दिलजीतला अनेक सेलिब्रिटींचं समर्थन मिळत आहे. स्वरा भास्कर, अंगद बेदी, कुब्रा सैत, श्रुति सेठने बिनधास्तपणे दिलजीतला सपोर्ट केलाय. स्वरा भास्कर दिलजीतला स्टार म्हणाली तर श्रुति सेठ त्याला पंजाब्यांची शान म्हणाली.

ज्या वयोवृद्ध आजी मोहिंदर कौर यांच्याबाबत कंगनाने चुकीचं वक्तव्य  केलं होतं त्यांनी कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. एका रिपोर्टनुसार, मोहिंदर कौर म्हणाल्या की, 'मला कुणीतरी सांगितलं होतं की एका अभिनेत्रीने माझ्याबाबत असं लिहिलंय. ती कधी माझ्या घरी नाही आली, तिला हे माहीत नाही मी काय करते आणि म्हणते मी १०० रूपयात उपलब्ध आहे. फार वाईट बाब आहे. मी १०० रूपयांचं काय करणार'. मोहिंदर कौर यांच्याकडे १३ एकर जमीन आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bollywood celebrities support Diljit Dosanjh after he engages in war of words with Kangana Ranaut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.