'या' बॉलिवूड अभिनेत्रीने केला बिनधास्त खुलासा, राहुल द्रविड माझं पहिलं प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 12:03 PM2021-11-23T12:03:42+5:302021-11-23T12:04:09+5:30

Rahul Dravid : राहुल द्रविडने भारतासाठी १६४ टेस्ट मॅचमध्ये १३२८८ रन आणि ३४४ वनडे मॅचेसमध्ये १०८८९ रन केले आहेत. नुकतीच त्याची निवड टीम इंडियाचा मुख्य कोच म्हणून झाली आहे.

Bollywood actress Richa Chadha says Rahul Dravid is her first love | 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने केला बिनधास्त खुलासा, राहुल द्रविड माझं पहिलं प्रेम

'या' बॉलिवूड अभिनेत्रीने केला बिनधास्त खुलासा, राहुल द्रविड माझं पहिलं प्रेम

googlenewsNext

भारतीय क्रिकेटचा महान फलंदाज आणि टीम इंडियाचा सध्याचा मुख्य कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) भलेही सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव नाही. पण त्याची फॅन फॉलोईंग खूप जबरदस्त आहे. नुकताच एका बॉलिवूड अभिनेत्रीने खुलासा केला की, राहुल द्रविड हा तिचं पहिलं प्रेम आहे.

अभिनेत्रीचा खुल्लम खुल्ला खुलासा 

बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढाने (Richa Chadha) राहुल द्रविडला आपलं पहिलं प्रेम म्हटलं आहे. ऋचा चड्ढा  ने द टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना सांगितलं की, आता ती क्रिकेट जास्त फॉलो करत नाही. पण कधी कधी राहुल द्रविडला बघण्यासाठी मॅच बघत होती.

काय म्हणाली ऋचा चड्ढा?

ऋचा चड्ढा म्हणाली की,  जेव्हा राहुल द्रविडने रिटायरमेंट घेतली, तेव्हापासून तिने क्रिकेट बघणं बंद केलं होतं. ती म्हणाली की, 'बालपणी मी क्रिकेटची फार मोठी फॅन नव्हते. माझा भाऊ क्रिकेट खेळत होता. एक वेळ होती जेव्हा मी टीव्हीवर क्रिकेट मॅच बघत होते. मला राहुल द्रविडला खेळताना बघणं खूप आवडत होतं. जेव्हापासून त्याने क्रिकेट खेळणं सोडलं, तेव्हापासून मी क्रिकेट फॉलो करणं सोडलं. माझं पहिलं प्रेम राहुल द्रविड आहे'.

टीम इंडियाचा कोच राहुल द्रविड

राहुल द्रविड हा भारतीय क्रिकेटच्या  इतिहासातील महान फलंदाजांपैकी एक आहे. राहुल द्रविडने भारतासाठी १६४ टेस्ट मॅचमध्ये १३२८८ रन आणि ३४४ वनडे मॅचेसमध्ये १०८८९ रन केले आहेत. नुकतीच त्याची निवड टीम इंडियाचा मुख्य कोच म्हणून झाली आहे.
 

Web Title: Bollywood actress Richa Chadha says Rahul Dravid is her first love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.