ठळक मुद्देइंडस्ट्रीत ह्या अभिनेत्रींचे नाव खूप मोठे आहे, मात्र एकमेकांशी यांचे अजिबात पटत नाही. यांच्यातील वादाला बराच काळ लोटला गेला.तरीही त्या एकमेकांचे अजूनही तोंड पाहण पसंत करत नाही.

-रवींद्र मोरे
बॉलिवूडमध्ये अशा काही घटना घडतात, ज्या जाणून घेण्यासाठी सर्वसामान्य जनता नेहमी उत्सुक असते. आता हेच पाहा ना, इंडस्ट्रीत ह्या अभिनेत्रींचे नाव खूप मोठे आहे, मात्र एकमेकांशी यांचे अजिबात पटत नाही. विशेष म्हणजे यांच्यातील वादाला बराच काळ लोटला गेला, मात्र तरीही त्या एकमेकांचे अजूनही तोंड पाहण पसंत करत नाही. जाणून घेऊया त्या अभिनेत्रींबाबत...

करिना कपूर - बिपाशा बसू


‘अजनबी’ चित्रपटात एकत्र दिसलेल्या बिपाशा आणि करिना या एकेकाळी चांगल्या मैत्रिणी होत्या. मात्र या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी सर्व जण बिपाशाच्या सेक्स अपीलबाबत चर्चा करत असत. नेमकी हीच गोष्ट त्यांच्या मैत्रीला संपुष्टात आणण्यास कारणीभूत ठरली. बिपाशाबाबतची ही गोष्ट करिनाला अजिबात आवडली नव्हती. त्यामुळे चिडून करिनाने बिपाशाला सर्वांसमोर काळी मांजर (ब्लॅक कॅट) असे म्हटले. करिना एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने बिपाशाला थोबाडीतही मारली होती. तेव्हापासून दोघींमध्ये जी कटूता निर्माण झाली ती आजपर्यंत आहे.

प्रियांका चोप्रा - करिना कपूर


‘ऐतराज’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान प्रियांका चोप्रा आणि करिना कपूर यांच्यात चांगली मैत्री होती. मात्र चित्रपट रिलीज झाल्यानंतर दोघींनी एकमेकांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने दोघींच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला. करिनाने एका मुलाखतीत म्हटले होते, की राणी मुखर्जीशिवाय मी इतर कुठल्याही अभिनेत्रीला मानत नाही. त्यानंतर एका चॅट शोमध्ये प्रियांकाने करिनाची बोलण्याची लकब बनावट असल्याचे म्हटले होते. याशिवाय 'ऐतराज' चित्रपटातील प्रियांकाच्या कामाचे सर्वांनी कौतुक केले होते, आणि क रिनाकडे दुर्लक्ष केले होते, हे दुसरे कारण तर करिनाच्या एक्स बॉयफ्रेंड शाहिदच्या आयुष्यात प्रियांकाची एन्ट्री या तिसऱ्या कारणाचीही दोघांमध्ये कटूता निर्माण होण्यामध्ये भर पडली.

कॅटरिना कैफ - प्रियांका चोप्रा


कॅटरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा यांच्यात एक अवॉर्ड फंक्शन वादास कारणीभूत ठरले. झाले असे की, एका अवॉर्ड फंक्शनदरम्यान दोघीपैकी एकीला शो स्टॉपरची भूमिका बजवायची होती. प्रियांकाने मोठ्या मनाने ही संधी कॅटरिना दिली. नंतर कॅटरिनाने म्हटले होते, की या शोसाठी पहिली पसंती तीच होती. कॅटरिनाच्या या कमेंटनंतर प्रियांका खूपच नाराज झाली होती, आणि ही नाराजी अजूनही कायम असून, दोघी एकमेकींकडे दुर्लक्ष करत असल्याचे सहज दिसून येते.

दीपिका पादुकोण - कॅटरिना कैफ


सध्याच्या बी टाऊनच्या आघाडीच्या अभिनेत्र्या दीपिका पदुकोण आणि कॅटरिना कैफ या दोघीही एकेकाळी चांगल्या मैत्रिणी होत्या. मात्र रणबीर कपूरमुळे दोघांच्या मैत्रीला तडा गेला तो आजपर्यंत कायम आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कॅटरिना कैफमुळेच रणबीर आणि दीपिकाचे ब्रेकअप झाले होते. आज मात्र परिस्थिती अशी आहे, की कॅटरिना आणि रणबीर कपूरचे ब्रेकअप झाले असले तरी दीपिकाच्या आयुष्यात रणवीर सिंहने प्रेमाच्या रूपात पदार्पण केले आहे.

राणी मुखर्जी - ऐश्वर्या राय बच्चन


राणी आणि ऐश्वर्या या दोघीही करिअरच्या सुरुवातीला चांगल्या मैत्रिणी होत्या. मात्र दोघींमधील भांडणाचे कारण 'चलते-चलते' हा चित्रपट ठरला. या सिनेमासाठी सुरुवातीला ऐश्वर्याला साइन करण्यात आले होते. मात्र नंतर राणीने ऐश्वर्याला रिप्लेस केले. राणी मुखर्जी बच्चन कुटुंबीयांच्या खूप जवळ होती. मात्र ऐश्वर्यासोबतच्या कॅट फाईटमुळे तिला अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नात आमंत्रित करण्यात आले नव्हते. इतकेच नाही तर ऐश्वर्याने अभिषेकला राणीसह सिनेमात काम न करण्याची ताकिद दिल्याचेही समजते.

ऐश्वर्या राय बच्चन - सोनम कपूर


ऐश्वर्या आणि सोनम अगोदर चांगल्या बेस्ट फे्रंड होत्या, मात्र २००९ मध्ये कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्याने सोनमसोबत कानच्या रेड कार्पेटवर चालण्यास नकार दिला होता. नेमकी हिच बाब दोघांमध्ये दुरावा निर्माण होण्यास कारणीभूत ठरली. झाले असे की, ऐश्वर्या ज्या ब्रॅण्डची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर होती, त्याच ब्रॅण्डसाठी नंतर सोनमची निवड झाली होती. तेव्हा सोनमने ऐश्वर्याला आंटी म्हटले होते. त्यामुळे ऐश्वर्या तिच्यावर नाराज होती आणि म्हणूनच ऐश्वर्याने कानमध्ये सोनमसोबत रेड कार्पेटवर जाण्यास नकार दिला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Biggest Cat Fights Of Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.