बॉलिवूडची दंगल गर्ल फातिमा सना शेखने दंगलमधून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. सर्वांना वाटतं की फातिमाचा दंगल हा पहिला चित्रपट आहे. मात्र दंगल हा तिचा पहिला चित्रपट नसून तिने याआधी बालकलाकार म्हणून काम केले आहे. फातिमाने वयाच्या पाचव्या वर्षी अभिनयाच्या कारकीर्दीला सुरूवात केली आहे. 

फातिमा सना शेखने वयाच्या पाचव्या वर्षी पहिल्यांदा चित्रपटात काम केले आहे. तिने कमल हसन यांच्यासोबत चाची ४२० चित्रपटात त्यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट १९९७ साली प्रदर्शित झाला होता.

फातिमाने चाची ४२० चित्रपटात भारतीची भूमिका केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांंगला प्रतिसाद मिळाला होता. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहे.

फातिमाचा पहिलाच चित्रपट चाची ४२० असला तरीदेखील या चित्रपटाच्या तिच्याकडे काही आठवणी नाहीत. याबाबत तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, मी त्यावेळी खूप लहान होती. कमल सरांसोबत केलेल्या कामाच्या माझ्याकडे फार काही आठवणी नाही आहेत. मला इतकंच आठवतं आहे की मी त्यांच्यासोबत खूप चांगला टाईम स्पेन्ड केला आहे. बालपणी तुम्ही खूप निरागस असता. त्यावेळी तुम्ही अभिनयाबद्दल विचार करत नाही. तुम्ही फक्त असता आणि तुम्हाला सांगितले जाते तसं काम करता.

चाची ४२०नंतर फातिमा इश्क बडे दिलवालामध्येही झळकली होती. या शिवाय वन टू का फोर चित्रपटात जॅकी श्रॉफच्या मुलीची भूमिका केली होती. तसेच फातिमा तहान, बिट्टू बॉस व आकाश वाणीमध्ये ती दिसली होती. 


फातिमा शेवटची ठग्स ऑफ हिंदोस्तानमध्ये दिसली.

Web Title: This aunt in 'Aunt 2' is now as big as she is now, the famous Bollywood actress.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.