बसपन का प्यार मेरा भूल नही जाना रे...! ट्रेंडीग गाण्याने अनुष्काची झोप उडाली रे..!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 11:05 AM2021-07-29T11:05:27+5:302021-07-29T11:12:12+5:30

बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनाही ‘बसपन का प्यार’ या गाण्याने अक्षरश: वेड लावले आहे. अनुष्का शर्माही याला अपवाद नाही. अनुष्कालाही या गाण्याने भुरळ घातली आहे.

anushka sharma funny post about jane meri jaaneman baspan ka pyar mera bhul nanhin jana re | बसपन का प्यार मेरा भूल नही जाना रे...! ट्रेंडीग गाण्याने अनुष्काची झोप उडाली रे..!

बसपन का प्यार मेरा भूल नही जाना रे...! ट्रेंडीग गाण्याने अनुष्काची झोप उडाली रे..!

Next
ठळक मुद्देसोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडीओमुळे सहदेव जणू स्टार झाला आहे. बुधवारी छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सहदेवची भेट घेत त्याचा सन्मान केला.

छत्तीसगडच्या सहदेव दिर्दोच्या ‘बसपन का प्यार’ (Baspan Ka Pyar) या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हे गाणे तुफान व्हायरल होतेय. गाण्यावरच्या मीम्सचा जणू महापूर आला आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनाही सहदेवच्या या गाण्याने अक्षरश: वेड लावले आहे. अनुष्का शर्माही (Anushka Sharma) याला अपवाद नाही. अनुष्कालाही या गाण्याने भुरळ घातली आहे. अगदी रात्रंदिवस या गाण्याचे शब्द तिच्या कानात रूंजी घालत आहेत. अगदी या गाण्याने अनुष्काची रात्रीची झोपही उडालीय.

अनुष्काने इन्स्टास्टोरीवर एक धम्माल मीम शेअर केले आहे. यात एक माणूस रात्री झोपण्याचा प्रयत्न करतोय. मात्र त्याला काही केल्या झोप येत नसते. त्याच्या डोक्यात सहदेवचे ‘बसपन का प्यार’ हे एकच गाणे फिरत असते.  हे मीम शेअर करत अनुष्काने हसण्याचे स्माईली शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर वायरल होणा-या सहदेवच्या गाण्याचा ओरिजनल व्हिडीओ दोन वर्षांपूर्वी युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. ज्यात सहदेव त्याच्या शिक्षकांसमोर ‘बसपन का प्यार मेरा भूल नही जाना रे’ गाताना दिसतोय. पुन्हा एकदा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. अगदी रॅपर बादशाहने स्वत: त्याच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला होता. इतकेच नाही त्याने सहदेवसोबत व्हिडीओ कॉलवर गप्पा मारत त्याला चंदीगडला भेटायला बोलवले आहे. 
सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडीओमुळे सहदेव जणू स्टार झाला आहे. बुधवारी छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सहदेवची भेट घेत त्याचा सन्मान केला. कॉमेडियन भारती सिंह, कृष्णा अभिषेक आणि सुदेश लहरीने देखील ‘द कपिल शर्मा’ शोच्या प्रोमोमध्ये या गाण्यावर ठेका धरला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: anushka sharma funny post about jane meri jaaneman baspan ka pyar mera bhul nanhin jana re

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app