AK vs AK ! अनिल कपूर व अनुराग कश्यप ट्विटरवर का भांडले? कारण ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 12:49 IST2020-12-07T12:48:51+5:302020-12-07T12:49:55+5:30

जाणून घ्या ‘ट्विटर वॉर’चे सत्य

anurag kashyap and anil kapoor twitter war for movie ak vs ak on netflix india | AK vs AK ! अनिल कपूर व अनुराग कश्यप ट्विटरवर का भांडले? कारण ऐकून व्हाल थक्क

AK vs AK ! अनिल कपूर व अनुराग कश्यप ट्विटरवर का भांडले? कारण ऐकून व्हाल थक्क

ठळक मुद्देअनिल कपूरच्या एका सिंपल ट्विटने या प्रमोशन स्टंटची सुरुवात झाली.

रविवारी अनिल कपूर आणि अनुराग कश्यप यांच्यात चांगलेच ट्विटर वॉर रंगले. दोघांनीही एकमेकांची उणीदुणी काढण्यात कोणतीही कसर सोडली नाही. अनुरागने अनिल कपूरच्या करिअरला ‘खटारा’ म्हटले.  अनिल कपूर यांनीही ‘माझी गाडी 40 वर्षे तरी चालली. तुझी तर अद्यापही गॅरेजमध्येच उभी आहे,’ असे म्हणून अनुरागला डिवचले. अनिल विरूद्ध अनुरागचे हे ट्विटर वॉर पाहून चाहतेही दंग झालेत. हे दोघे इतके का भांडताहेत, हेच लोकांना कळेनासे झाले. पण आता चिंतेचे कारण नाही. होय, कारण या भांडणाचे कारण आता स्पष्ट झालेय. मुळात हे भांडण नव्हतेच तर एक प्रमोशन स्टंट होता, हेही स्पष्ट झालेय.

हा प्रमोशन स्टंट कशासाठी तर एका चित्रपटासाठी. येत्या दिवसांत नेटफ्लिक्सवर ‘AK vs AK ’ हा सिनेमा रिलीज होतेय. यात अनिल कपूर आणि अनुराग कश्यप दोघेही दिसणार आहेत. रिपोर्टनुसार, ‘AK vs AK ’ या सिनेमात अनुराग कश्यप अनिल कपूरच्या मुलीला किडनॅप करेल आणि यामुळे दोघेही एकमेकांशी भिडतील. याच सिनेमाची झलक दोघांनी रविवारी टिष्ट्वटरवर दाखवली. याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी अनिल व अनुराग ट्विटरवर एकमेकांशी भिडले. ‘सेक्रेड गेम्स’ फेम विक्रमादित्य मोटवानी हा सिनेमा दिग्दर्शित करतोय.

म्हणे, तुझी गाडी खटारा...! कंगना-दिलजीतनंतर अनिल कपूर-अनुराग कश्यपमध्ये जुंपली

असा सुरु झाला वाद
अनिल कपूरच्या एका सिंपल ट्विटने या प्रमोशन स्टंटची सुरुवात झाली. अनिलने ट्विटरवर दिल्ली क्राईम सीरिजच्या टीमची प्रशंसा करत एक पोस्ट शेअर केली. ‘तुम्ही डिझर्व्ह करता. आता आणखी काही लोकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळतेय, याचा आनंद आहे,’ असे ट्विट अनिलने केले.  यावर अनुरागने असा काही रिप्लाय दिला की, अनिलला तो खटकला.

‘काही चांगल्या लोकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळतेय, याचा आनंद आहेच. पण तुझा ऑस्कर कुठे आहे? नाही? मग किमान नामांकन तरी?’, असे डिवचणारे ट्विट अनुरागने केले. यावर अनिलनेही जशास तसे उत्तर दिले. ‘माझे सोड, तुला तर ऑस्कर तेव्हाच पाहिला असशील जेव्हा स्लमडॉग मिलेनियरला ऑस्कर मिळताना टीव्हीवर पाहिले असशील, ’ असे अनिलने लिहिले. यावर अनुराग कसा शांत बसणार? त्याने अनिलला आणखी डिवचले. ‘स्लमडॉग मिलेनियरसाठी तर शाहरूखला कास्ट करण्याची तयारी सुरु होती. तू कदाचित या चित्रपटासाठी सेकंड च्वॉईस होता ना?’, असा सवाल त्याने केला. अनिलने यावरही उत्तर दिले. ‘कोणी काम सोडले आणि मी ते केले. मला याची अजिबात पर्वा नाही. काम तर काम असते. तुझ्यासारखे काम शोधण्यासाठी केस उपटावे लागत नाहीत,’ असे अनिलने लिहिले.

अनुरागने यावर काय उत्तर दिले. ‘सर, तुम्ही केसांबद्दल तर बोलूच नको. तुम्हाला याच केसांच्या जोरावर चित्रपटात भूमिका मिळतात,’ असे त्याने लिहिले. यावर अनिल कपूरलाही जोर चढला. ‘बेटा, तुला माझ्यासारख्या करिअरसाठी सीरिअस स्किलची गरज आहे. अशीच माझी गाडी 40 वर्षांपासून धावत नाहीये,’ असे त्याने सुनावले. अनिलने करिअरवरून डिवचल्यावर अनुरागही चिवताळला. ‘सर, प्रत्येक 40 वर्षे जुन्या गाडीला विंटेज म्हणता येत नाही. काहींना खटारा सुद्धा म्हणतात,’असे जबरदस्त उत्तर त्याने दिले. यावर अनिल कपूरही शांत थोडीच बसणार. ‘माझी गाडी 40 वर्षे तरी चालली.
तुझी तर अद्यापही गॅरेजमध्येच उभी आहे,’असे त्याने लिहिले. हा एकमेकांवर कुरघोडी करण्याचा सिलसिला इथेच थांबला नाही. यानंतर दोघांनीही एकमेकांवर असा काही शाब्दिक वार केला की, बघणारेही थक्क झालेत.

Web Title: anurag kashyap and anil kapoor twitter war for movie ak vs ak on netflix india