अंकिता लोखंडेने सर्वांसमोर बॉयफ्रेन्ड विकी जैनला केले किस, व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 10:05 AM2020-09-14T10:05:45+5:302020-09-14T10:07:36+5:30

अंकिता व विकीचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

ankita lokhande kisses boyfriend vicky jain in public video viral on social media | अंकिता लोखंडेने सर्वांसमोर बॉयफ्रेन्ड विकी जैनला केले किस, व्हिडीओ झाला व्हायरल

अंकिता लोखंडेने सर्वांसमोर बॉयफ्रेन्ड विकी जैनला केले किस, व्हिडीओ झाला व्हायरल

googlenewsNext
ठळक मुद्देज्या व्यक्तीवर तुमचे  प्रेम आहे, ती व्यक्ती नैराश्यात असतानाही तुम्ही तिला ड्रग्स देणार का? असा सवाल करत अलीकडे अंकिताने  रिया चक्रवर्तीवर टीका केली होती़.

सुशांत सिंग राजपूतला न्याय मिळवून देण्याच्या लढाईत त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असलेली अंकिता लोखंडे हिला गेल्या काही दिवसांपासून प्रचंड टीकेला सामोरे जावे लागत आहे. अंकिता हे सर्व काही प्रसिद्धीसाठी करतेय, असा अलीकडे रिया चक्रवर्तीची मैत्रिण शिबानी दांडेकरने केला होता. तिच्या या टीकेला अंकितानेही परखड उत्तर दिले होते. एकीकडे अंकिता सुशांत प्रकरणामुळे चर्चेत आहे. दुसरीकडे बॉयफ्रेन्ड विकी जैनमुळेही ती चर्चेत आली आहे. तिचा व विकीचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

तसा हा व्हिडीओ जुना आहे. यात अंकिता व विकी पार्टीत डान्स करताना दिसत आहेत.  व्हिडीओत आधी अंकिता विकीसोबत डान्स करते, मग त्याला अलिंगण देते आणि नंतर सर्वांसमोर किस करते. हा व्हिडीओ 2019 मधील असल्याचे कळतेय. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने हा व्हिडीओ त्याच्या अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

अंकिता आधी सुशांतसोबत रिलेशनशिपमध्ये होती़ सहा वर्षे दोघे एकमेकांना डेट करत होते. मात्र 2016 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर अंकिताच्या आयुष्यात विकी जैनची एन्ट्री झाली. गेल्यावर्षी अंकिताने विकीसोबतचे तिचे नाते पब्लिक केले होते. काही महिन्यांपूर्वी अंकिताने रिंगचा फोटो शेअर केला होता. त्यावरून तिने विकीसोबत साखरपुडा केल्याचे म्हटले गेले होते. अर्थात अंकिताने या वृत्ताला अद्यापही दुजोरा दिलेला नाही.

सुशांतच्या स्वप्नपूर्तीसाठी..

सुशांतला एक हजार झाडं लावण्याची इच्छा होती. सुशांतने अनेक स्वप्नांची यादी बनवली होती. यापैकीच एक स्वप्न म्हणजे त्याला एक हजार झाडं लावायची व जगवायची होती. सुशांतचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंकिता पुढे सरसावली आहे. घरात झाडं लावत तिने सुशांतच्या या स्वप्नपूर्तीच्यादिशेने एक पाऊल टाकले आहे. पोस्टद्वारे खुद्द अंकिताने ही माहिती दिली. यानंतर अनेक चाहत्यांनी तिच्या या कृतीचे कौतुक केले.

हे सारं पब्लिसिटीसाठी...! शिबानी दांडेकर बोलली, अंकिता लोखंडेच्या फॅन्सची सटकली

अंकिता लोखंडेला बरं-वाईट बोलली; हेटर्सनी शिबानी दांडेकरची 'ओळखच बदलली'!

तुम्ही त्याला ड्रग्ज देणार का?
ज्या व्यक्तीवर तुमचे  प्रेम आहे, ती व्यक्ती नैराश्यात असतानाही तुम्ही तिला ड्रग्स देणार का? असा सवाल करत अलीकडे अंकिताने  रिया चक्रवर्तीवर टीका केली होती़. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी असलेल्या रियाला नुकतीच  एनसीबीने अटक केली. रियाच्या अटकेनंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर रियाला पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर अंकिताने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित रिया आणि तिला पाठींबा देणा-यांना सुनावले होते.

Web Title: ankita lokhande kisses boyfriend vicky jain in public video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.