बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली बऱ्याचदा सोशल मीडियावरील फोटोंमुळे व अफेयरमुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा ती लिंकअपच्या वृत्तामुळे चर्चेत आली आहे. सध्या तिचं नाव जावेद जाफरीचा मुलगा मीजानसोबत नाव जोडलं जातंय. 

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा आणि जावेद जाफरीचा मुलगा मीजान जाफरी यांच्या लिंकअपची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

खरेतर मीजान व नव्या यांचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर त्या दोघांच्या लिंकअपचे वृत्त समोर आले. मात्र याप्रकरणी मीजाननं खुलासा केला आहे. मीजानने सांगितलं की, नव्या त्याच्या बहिणीची बेस्ट फ्रेंड आहे आणि ती त्याचीदेखील खूप चांगली मैत्रिण आहे.


मीजान संजय लीला भन्साळी यांच्या प्रोडक्शन अंतर्गत बनत असलेला चित्रपट मलालमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतो आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मंगेश हाडवळे यांनी केले आहे. मलाल हा एक रोमाँटिक सिनेमा आहे. ज्यात शर्मिन आणि मिजान रोन्मास करताना दिसणार आहेत.

संजय लीला भंन्साळी यांनी याआधी ही बॉलिवूडमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना लाँच केले आहे. ११ वर्षांपूर्वी त्यांनी सोनम कपूर आणि रणबीर कपूर यांना ‘सावरियां’मधून लॉन्च केले होते. हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फ्लॉप ठरला होता. पण यातील सोनम आणि रणबीरचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता.

आता भन्साळी खुद्द आपल्या भाचीला लॉन्च करणार आहेत. शर्मिन ही भन्साळींच्या बहीणीची मुलगी आहे.

 हा चित्रपट ५ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Amitabh Bachchan's granddaughter is dating this Star Kid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.