रणबीर कपूरच्या कुटुंबासोबत आलिया भट करणार न्यू इअर सेलिब्रेशन, प्राइवेट जेटने झाले रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 18:12 IST2020-12-29T18:11:47+5:302020-12-29T18:12:22+5:30
अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट नुकतीच कलिना एअरपोर्टवर कपूर कुटुंबासोबत दिसली.

रणबीर कपूरच्या कुटुंबासोबत आलिया भट करणार न्यू इअर सेलिब्रेशन, प्राइवेट जेटने झाले रवाना
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट नुकतीच कलिना एअरपोर्टवर कपूर कुटुंबासोबत दिसली. रणबीर कपूरने ब्लू कलरचा ट्रॅक सूट परिधान केला होता आणि व्हाइट स्पोर्ट शूजसोबत ब्लॅक सनग्लासेस लावले होते. रणबीरसोबत आलियाशिवाय नीतू कपूर, रिद्धीमा कपूर साहनी, तिचा नवरा आणि मुलगी सोबत दिसली. न्यू इअरच्या आधी आलिया-रणबीर संपूर्ण कपूर कुटूंबासोबत रणथंबौरसाठी एका प्राइव्हेट जेटमध्ये रवाना झाले आहेत.
आलिया अनऑफिशियली रणबीर कुटुंबाची हिस्सा बनली आहे आणि कपूर कुटुंबाच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये सहभागी होताना दिसते. आता ती कपूर कुटुंबासोबत या ट्रीपवर जाताना दिसली. यावेळी आलिया भटने ऑलिव्ह ग्रीन कलरची कार्गो आणि व्हाइट टॉपमध्ये दिसली. आलियाने कार्गोला मॅचिंग रंगाची जॅकेट घातले होते.या गेटअपमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. रणबीर कपूरसारखेच आलियाने व्हाइट रंगाचे स्पोर्ट्स शूज घातले होते आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क घातला होता.
नीतू कपूर एअरपोर्टवर गाडीतून उतरल्यानंतर आलिया भटला मिठी मारताना दिसली. आलिया भट आता कपूर कुटुंबाच्या जवळपास सर्वच इव्हेंट्समध्ये सहभागी होताना दिसते. काही दिवसांपूर्वी आलिया भट कपूर फॅमिलीच्या ख्रिसमस पार्टीमध्येही दिसली होती. लग्नाबद्दल रणबीर कपूरने एका मुलाखतीत सांगितले की, यावर्षी कोरोनामुळे लग्नबेडीत अडकू शकले नाही.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर आलिया भट आणि रणबीर कपूर लवकरच ब्रह्मास्त्रमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.