OMG!! ‘हे बेबी’मधील चिमुरडी इतकी मोठी झाली, फोटो पाहून ओळखणंही कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 08:00 AM2022-01-24T08:00:00+5:302022-01-24T08:00:03+5:30

Hey Baby Chlid Artist: होय, तिचे ताजे फोटो पाहाल तर हीच ती यावर विश्वास बसणार नाही. ताज्या फोटोत ती तिच्या मैत्रिणींसोबत पोझ देताना दिसतेय.

akshay kumar daughter angel in hey baby juanna sanghvi latest photo | OMG!! ‘हे बेबी’मधील चिमुरडी इतकी मोठी झाली, फोटो पाहून ओळखणंही कठीण

OMG!! ‘हे बेबी’मधील चिमुरडी इतकी मोठी झाली, फोटो पाहून ओळखणंही कठीण

googlenewsNext

2007 साली आलेला ‘हे बेबी’ (Hey Baby ) हा अक्षय कुमारचा (Akshay Kumar) सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. यात अक्षय व विद्या बालनची मुलगी एंजलही तुम्हाना आठवत असणार. ही एंजल आता बरीच मोठी झाली आहे. होय, तिचे ताजे फोटो पाहाल तर हीच ती यावर विश्वास बसणार नाही.

एंजलची ही भूमिका साकारली होती जुआना सांघवी (Juanna Sanghvi) हिने. जुआनाचे ताजे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिचे हे फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. ही तीच मुलगी आहे, यावर विश्वास बसत नाहीये, इतकी मोठी झाली, अशा आशयाच्या कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
‘हे बेबी’मध्ये काम केलं तेव्हा जुआना सांघवी केवळ 16 महिन्यांची होती. आता ती 17 वर्षांची झाली आहे. ताज्या फोटोत ती तिच्या मैत्रिणींसोबत पोझ देताना दिसतेय.

‘हे बेबी’मध्ये आपल्या मनमोहक हास्याने पे्रक्षकांचे मन जिंकणारी जुआना यानंतर कोणत्याच चित्रपटात दिसली नाही. अद्याप तिच्या नव्या प्रोजेक्टबद्दल काहीही कन्फर्म नाही. पण या क्यूट जुआनाला पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर पाहायला प्रेक्षक मात्र आतुर आहेत.

‘हे बेबी’ या चित्रपटात अक्षय कुमार, फरदीन खान व रितेश देशमुख यांनी लीड रोल साकारला  होता. सिनेमात अक्षय, रितेश आणि फरदीनच्या घराबाहेर अचानक अज्ञात व्यक्ती एक मुलगी सोडून जाते. सुरूवातीला मुलीला समजून घेण्यात त्यांना फार त्रास होतो पण नंतर मात्र या तिघांच्या आयुष्याचं केंद्रस्थान होते. 2007मध्ये आलेल्या या सिनेमात बोमन इराणी यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. 
 

Web Title: akshay kumar daughter angel in hey baby juanna sanghvi latest photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.