अक्षय कुमार आणि विद्या बालन यांचा 'मिशन मंगल' आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 07:27 PM2019-10-11T19:27:33+5:302019-10-11T19:28:01+5:30

टेलिव्हिजनच्या आधी 'मिशन मंगल' सिनेमा डिजिटल प्लॅटफॉर्मवर पहायला मिळणार आहे.

Akshay Kumar and Vidya Balan's 'Mission Mangal' on digital platforms now | अक्षय कुमार आणि विद्या बालन यांचा 'मिशन मंगल' आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर

अक्षय कुमार आणि विद्या बालन यांचा 'मिशन मंगल' आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर

googlenewsNext

हॉटस्टार व्हीआयपीने सिनेमांच्या आपल्या विस्तृत यादीमध्ये आता मिशन मंगलची भर घातली आहे. या सिनेमाने जगभरात बॉक्स ऑफिसवर आपली मोहोर उमटवत तब्बल 200 कोटींचा पल्ला पार केला. देशप्रेमाची भावना रुजवणारा हा सिनेमा आता हॉटस्टार व्हीआयपीवर उपलब्ध झाला आहे. या सिनेमाच्या टीव्हीवरील प्रीमिअरच्या कित्येक दिवस आधी म्हणजेच १० ऑक्टोबर २०१९ पासून हॉटस्टार व्हीआयपीवर हा सिनेमा स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध झाला आहे. अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा आणि तापसी पन्नू हे बॉलिवुडचे लोकप्रिय कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. 

मंगळ ग्रहावर पोहोचण्याच्या देशाच्या पहिल्याच प्रयत्नाला यशस्वी करण्यासाठी भारतातील काही सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांनी अनेक अडथळ्यांवर मात करत अथक प्रयत्न केले. त्यांच्या या अद्वितीय प्रवासाची ही कथा आहे.

विद्या बालन म्हणाली, मिशन मंगल हा फार खास सिनेमा आहे. यात अनेक महिला मध्यवर्ती भूमिकेत आहेत. अशा सिनेमांमुळे या प्रकारच्या मोहिमांबद्दल जनजागृती होतेच. शिवाय, महिला खंबीर असतात, आपण त्यांच्यावर विसंबून राहू शकतो, ही जाणीव तयार होते. हॉटस्टार व्हीआयपीमुळे आता हा सिनेमा देशभरात उपलब्ध होईल, याचा आम्हा सर्वांनाच आनंद आहे.


सोनाक्षी सिन्हा सुद्धा या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तिने सांगितलं की, कोणतीही मोहीम यशस्वी करण्यामागे लोकांनी किती अमर्याद मेहनत घेतलेली असते, प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी काय काय चालू असतं, हे आम्हाला मिशन मंगलमुळे समजून घेता आलं. हॉटस्टार व्हीआयपीवर या सिनेमाचा डिजिटल प्रीमिअर होणार असल्याने हा सिनेमा अनेक प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल.


मिशन मंगल ही कथा आहे राकेश धवन (अक्षय कुमार) आणि तारा शिंदे (विद्या बालन) या प्रतिभावान शास्त्रज्ञांची आणि एकता गांधी (सोनाक्षी सिन्हा), क्रितीका अगरवाल (तापसी पन्नू) अशा काही इतर शास्त्रज्ञांची. हे सगळे आपापल्या समस्यांवर, अपयशांवर मात करत एकत्र येतात आणि इतिहास
घडवणाऱ्या एका मोहिमेचे बळ ठरतात. ही कथा आहे सामान्य माणसांच्या असामन्य मेहनतीची. यातून अनेक पिढ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि असंभव असे काही गाठण्याची प्रेरणा मिळेल.

Web Title: Akshay Kumar and Vidya Balan's 'Mission Mangal' on digital platforms now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.