Aditya Narayan's pyjama tore during jaimala ceremony | अरे देवा...!  वरमाला घालताना फाटला आदित्य नारायणचा पायजामा, पुढची फजिती वाचा...

अरे देवा...!  वरमाला घालताना फाटला आदित्य नारायणचा पायजामा, पुढची फजिती वाचा...

ठळक मुद्देश्वेताने  2010 मध्ये आदित्यबरोबर शापित  या चित्रपटात  मुख्य भूमिका साकारली होती. तेव्हापासूनच आदित्य आणि श्वेताच्या रिलेशनशिपची चर्चा बॉलीवूडमध्ये होती.

टीव्ही होस्ट आणि गायक आदित्य नारायण नुकताच बोहल्यावर चढला. श्वेता अग्रवालसोबत त्याने लग्नगाठ बांधली. या शाही लग्नसोहळ्याचे एक ना अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. शिवाय एक मजेशीर किस्साही या लग्नाच्या निमित्ताने चाहत्यांना ऐकता आला. खुद्द आदित्यनेच हा किस्सा शेअर केला आणि मग काय चाहत्यांना हसू आवरता आले नाही.

तर वरमाला सोहळ्यात श्वेताच्या भावांनी तिला उचलले. मग आदित्यचे मित्र थोडीच मागे हटणार? त्यांनीही आदित्यला उचलले. पण याक्षणी काय झाले तर आदित्यचा पायजामा फाटला. पायजामा फाटल्याचे आदित्यच्या लगेच लक्षात आले. तो मित्रांच्या कानात कुजबुजला. अशास्थितीत हसावे की रडावे, हेच कोणाला कळेना. पण इलाज नव्हता. आदित्यने अशास्थितीत वरमाला सोहळा उरकला. पण तो टरकलेला पायजामा घालून नवरामुलगा पूर्णवेळ कसा मिरवणार? योगायोगाने आदित्यच्या मित्रांचा पायजामा आदित्यच्या पायजाम्याला मॅच होणारा होता. शेवटी आदित्यने मित्राचा पायजामा घातला आणि मग पुढचे सगळे विधी हसत खेळत आनंदात पार पडले. आदित्यने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत हा ऐकवला. तो क्षण खरे तर लाजिरवाणा होता. मी अख्खा आयुष्यात तो विसरू शकणार नाही, असे आदित्यने हसतहसत सांगितले.

श्वेताने  2010 मध्ये आदित्यबरोबर शापित  या चित्रपटात  मुख्य भूमिका साकारली होती. तेव्हापासूनच आदित्य आणि श्वेताच्या रिलेशनशिपची चर्चा बॉलीवूडमध्ये होती. आता तब्बल 10 वर्षांनंतर दोघेही लग्नबंधनात अडकले. आदित्य आणि श्वेताचा लग्न सोहळा कोरोनाच्या  काळातच पार पडला. फक्त 50 पाहुण्यांच्या उपस्थितीत  जुहूतील  इस्कॉन टेम्पल इथे हा विवाह सोहळा संपन्न झाला. आदित्यने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मी़डियावर शेअर केले होते.  आदित्यने लग्नात क्रीम कलरची शेरवानी घातली होती, तर श्वेतानेही क्रीम कलरच्या लेहंगा परिधान केला होता. ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. 

Aditya Narayan Wedding:आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवालच्या लग्नातील INSIDE फोटो पाहा.

श्वेता अग्रवालसोबत लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर आदित्य नारायण म्हणाला- स्वप्न पूर्ण झालं

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Aditya Narayan's pyjama tore during jaimala ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.