गायक आदित्य नारायणने मंगळवारी 1 डिसेंबरला अभिनेत्री श्वेता अग्रवालसोबत मंदिरात लग्न केले. या विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. श्वेतासोबत सात फेरे घेतल्यानंतर आदित्य खूप आनंदित आहे. त्याचे म्हणणे आहे की, श्वेताशी लग्न करणे हे एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे.
![]()
आदित्य आणि श्वेता 11 वर्षे एकमेकांना डेट करत होते. बॉम्बे टाईम्सशी बोलताना आदित्य म्हणाला, "माझे श्वेताशी लग्न झाले, हे मला स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटतेय. मी श्वेता सोडून इतर कोणाबरोबर आयुष्य घालवण्याचा विचार करू शकत नाही. तिने मला चांगला माणूस होण्यासाठी मदत केली आहे. श्वेता ही ती व्यक्ती आहे जिच्याबरोबर मी जसा आहे तसा राहतो ''
![]()
आदित्यचे वडील उदित नारायण आणि नातेवाईकांसह वरातीत डान्स केला. आदित्यने लग्नात क्रीम कलरची शेरवानी घातली होती, तर श्वेतानेही क्रीम कलरच्या लेहंगा परिधान केला होता. ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. याशिवाय श्वेता लहंगेसह कुंदनचे दागिने घातलेले होते.
आदित्याच्या रिसेप्शनचे आमंत्रण पंतप्रधान मोदी, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्ह, धर्मेंद्र, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण आणि माधुरी दीक्षित यांना पाठवण्यात आले आहे.
वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!
Web Title: After getting engaged to actress shweta agarwal, aditya narayan said- the dream has come true
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.