मॉडेल, अभिनेत्री व सायकोलॉजिस्ट असा प्रवास करणारी अदिती गोवित्रीकर काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपट 'स्माईल प्लीझ'मध्ये झळकली होती. आता ती एका हिंदी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे कोई जाने ना. हा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अनेक वर्ष कुटुंब आणि चित्रपटांवर लक्ष केंद्रित केल्यानंतर आदिती आता आपल्या शिक्षणाची इच्छा पूर्ण करत आहे. एम बी बी एस इन मेडिकल पूर्ण केल्या नंतर अदिती आता हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सायकॉलॉजीमध्ये मास्टर्स करत आहे.  तिच्या मास्टर प्रोग्रामच्या मध्यभागी आहे.


अदिती सांगते की, “आयुष्यात शिक्षण हा खूप महत्वाचा भाग असतो. मुख्यतः, कुठेतरी आपण सर्व जण असे विचार करतो की विशिष्ट वयानंतर अभ्यास सुरू करणे कठीण आहे. परंतु सत्य हे आहे की, हा एक स्वयंचलित अडथळा आहे, जे आपण स्वतः तयार करतो.  विशिष्ट वयानंतर अभ्यास करणे थांबवावे की नाही असा कुठलाही नियम किंवा कायदा नाही. म्हणून मी स्वतः साठी विचार केला की मी आजीवन विद्यार्थी राहणार आणि नवीन काहीतरी शिकत राहणार, कारण आपण काहीही नवीन शिकत असतो त्यासोबत आपले विचार पण बदलत असतात जे आपल्या मेंदूसाठी खूप आरोगी आहे.

अदिती गोवित्रीकर अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला रिएलिटी शो बिग बॉस ३, अक्षय कुमारचा शो खतरों के खिलाडी सीझन १ या रिएलिटी शोमध्ये भाग घेतला होता.

अदिती टी सीरिजच्या कोई जाने ना चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अमायरा दस्तूरही दिसणार आहे.

हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 

Web Title: Aditi Govitkar will be seen in this movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.