क्यूट आणि गॉर्जिअस अभिनेत्री वाणी कपूर सध्या तिच्या स्कॉटलंडमधील ‘बेलबॉटम’ चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती स्कॉटलंडला गेलीय. या चित्रपटात तिच्यासोबत सुपरस्टार अक्षयकुमार आहे. ती नुकतीच अजून एका  गोष्टीमुळे चर्चेत आल्याचे समजते. ते म्हणजे तिच्या शिक्षकदिनानिमित्त व्यक्त केलेल्या भावनांमुळे. ती म्हणते, ‘माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने मला घडवले, मला शिकवले.’ ती तिच्या यशाचे  क्रेडिट  तिचे वडील शिव, आई डिंपी कपूर आणि बहिण नुपूर चोप्रा यांना देते.

आज सर्वत्र साजरा करण्यात येणाऱ्या  शिक्षक दिनानिमित्त वाणी कपूर हिनेही तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती सांगते,‘माझ्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी केवळ माझी मेहनतच नव्हे तर माझ्या कुटुंबाचा पाठिंबा हा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. माझे कुटुंब कायम माझ्यासोबत उभे होते. त्यांनी मला कायम मार्गदर्शन केले. मला कधीही एखाद्या चांगल्या शिक्षकाला शोधण्याची गरज पडली नाही. कारण माझे कुटुंबच माझ्यासाठी कायम प्रेरणास्थानी होते. आयुष्य जगताना समोर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्याचे सामर्थ्य त्यांनीच मला दिले.’

चित्रीकरणाविषयी ती सांगते, ‘हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच खूप परीक्षेचे ठरले आहे, पण आता आपण नव्या नॉर्मलशी जुळवून घ्यायला हवं आणि त्याची सुरुवात आपण हळुहळू करत आहोत याचा मला आनंद आहे.’ अक्षयबरोबर शूटिंग सुरू करण्याची वाणीला उत्सुकता आहे आणि शूटिंगच्या दरम्यान या सुपरस्टारकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल असं तिला वाटतं. ती म्हणते, ‘मी पहिल्यांदाच अक्षय सरांबरोबर काम करतेय आणि हा अनुभव माझ्यासाठी खास असणार आहे हे मला माहीत आहे. मला माहीत आहे मी त्यांच्याकडून खूप काही शिकणार आहे. आपल्या कलेप्रती त्यांची समर्पित वृत्ती व त्यांचा ध्यास खरोखरंच आदर्श आहे आणि ते आमच्या सगळ्यांचे प्रेरणास्त्रोत आहेत. लोकांना आमची जोडी आवडेल अशी आशा आहे.’                                                                                                   

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress Vaani Kapoor share her feelings on Teacher's Day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.