हाइटच झाली, सेलिब्रेटींपेक्षा मॅनेजरच स्वतःला समजतात सेलिब्रेटी, जान्हवी कपूरचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 19:41 IST2021-03-08T19:38:50+5:302021-03-08T19:41:05+5:30
Janhvi Kapoor plays cool Over Staff Behaviour सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर मुंबई एअरपोर्टवरून बाहेर दिशेला जाताना दिसत आहे.

हाइटच झाली, सेलिब्रेटींपेक्षा मॅनेजरच स्वतःला समजतात सेलिब्रेटी, जान्हवी कपूरचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
आवडत्या सेलिब्रिटींसह फोटा काढावा, त्यांच्यासह सेल्फी असावा,ऑटोग्राफ घ्यावा किंवा मग एक झलक तरी पाहायला मिळावी अशी फॅन्सची इच्छा असते. मात्र सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात जान्हवी कपूरला पाहताच एका चाहत्याने जान्हवीसह फोटो काढण्याचा प्रयत्न केला.मात्र सेल्फी काढण्याआतच जान्हवी कपूरच्या मॅनेजरने असे काही केले की, व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल संताप. जान्हवीसह चाहत्याला सेल्फी हवा होता म्हणून त्याने मोबाइल जान्हवीच्या समोर नेला. मात्र मॅनेजरने काही कळण्याच्या आतच चाहत्याच्या हाताला जोरदार धक्का देत त्याला मागे ढकलले.
रागाच्या भरात मॅनेजने जे काही केले ते नक्कीच योग्य नसल्याच्या प्रतिक्रीयाही चाहत्यांच्या उमटत आहे. मॅनेजरने चाहत्याच्या हाताला धक्का दिला त्यावेळी जान्हवीही थोडी दचकली नेमकं काय घडलं तिलाही कळाले नाही. मात्र चाहत्याला सेल्फी काढायचं कळताच ती पुन्हा मागे फिरली आणि चाहत्याला सेल्फी दिला. तसेच नुकताच तिचा वाढदिवसही झाला. त्यामुळे एअरपोर्टवर मीडियाच्या फोटोग्राफर्सने तिच्यासाठी केक कटींग करत सेलिब्रेशनही केले.
दरम्यान 'गुड लक जेरी'च्या सेटवरील जान्हवीच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओत जान्हवी ड्रेसमध्ये ई-रिक्षा चालवताना दिसतेय. हा व्हिडीओ पोस्ट करताना जान्हवी कपूरने लिहिले, सिनेमाचे शूट्स मजेदार असते. सिद्धार्थ सेन गुप्ता या सिनेमाचे दिग्दर्शन करीत आहेत. दीपक डोब्रियाल, मीता वशिष्ठ, नीरज सूद आणि सुशांत सिंह हे या सिनेमात दिसणार आहेत. चित्रपटाची निर्मिती रंग यलो प्रोडक्शन, लिका प्रॉडक्शन आणि सनडियल एंटरटेन्मेंट यांनी केली आहे.
जान्हवीने ‘धडक’ सिनेमातून ईशान खट्टरसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर ती कार्तिक आर्यनसोबत 'दोस्ताना 2' मध्ये दिसणार आहे. याशिवाय जान्हवीच्या हातात करण जोहरची 'तख्त' देखील आहे. जान्हवीची बहीण खुशी कपूरच्या बॉलिवूडमध्ये एन्ट्रीची चर्चा सध्या जोरदार आहे.