३१ वर्षांपूर्वीच झालेली किंग खान सुपरस्टार होणार असल्याची भविष्यवाणी, हेमा मालिनी यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 11:13 IST2023-07-12T11:11:21+5:302023-07-12T11:13:01+5:30

"...तेव्हा गुरू मां यांनी मला शाहरुख खान सुपरस्टार होणार असल्याचं सांगितलं होतं", हेमा मालिनी यांचा मोठा खुलासा

actress hema malini revealed that her guru maa already predicted shah rukh khan stardom | ३१ वर्षांपूर्वीच झालेली किंग खान सुपरस्टार होणार असल्याची भविष्यवाणी, हेमा मालिनी यांचा खुलासा

३१ वर्षांपूर्वीच झालेली किंग खान सुपरस्टार होणार असल्याची भविष्यवाणी, हेमा मालिनी यांचा खुलासा

उत्तम अभिनय व मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडचा किंग अशी ओळख मिळवणारा अभिनेता शाहरुख खान चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. सध्या शाहरुख त्याच्या आगामी जवान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ८०च्या दशकापासून कलाविश्वात काम करणाऱ्या शाहरुखला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी त्यांच्या सिनेमातून पहिला ब्रेक दिला होता. तेव्हाच तो मोठा स्टार होईल याची भविष्यवाणी करण्यात आली होती, असा खुलासा हेमा मालिनी यांनी केला आहे. 

१९९२ साली प्रदर्शित झालेल्या 'दिल आशना है' या चित्रपटातून शाहरुखने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. हेमा मालिनी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यावेळी शाहरुखने तीन चित्रपटांसाठी होकार दिला होता. परंतु, हेमा मालिनी यांच्या 'दिल आशना है' चित्रपटाचं शूटिंग सगळ्यात आधी झालं होतं. या चित्रपटात शाहरुख खानला मुख्य भूमिकेत घेण्यामागचं कारण हेमा मालिनी यांनी 'लहरे रेट्रो'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. 

"त्या अंतवस्त्रामुळे आमच्या नात्यात दुरावा आला होता", हेमांगीच्या 'बाई, बुब्स आणि ब्रा' पोस्टनंतर दूर झाला चाहत्याचा गैरसमज

"शाहरुख तेव्हा 'फौजी' या मालिकेत काम करत होता. मी ती मालिका पाहायचे. तेव्हा मला तो खूप क्यूट वाटायचा. तेव्हा मी माझ्या चित्रपटासाठी स्क्रिप्ट लिहित होते. या सिनेमासाठी एक नवा चेहरा मला हवा होता. शाहरुखचं काम मला आवडलं होतं. या चित्रपटात तोच काम करणार, हे मी ठरवलं होतं," असंही हेमा मालिनी यांनी पुढे सांगितले. या चित्रपटासाठी शाहरुखची मुलाखतही हेमा मालिनी यांनीच घेतली होती. 

"तुम्ही खूप एन्जॉय करता", अवधूत गुप्तेच्या काश्मीरमधील फोटोवर चाहत्याची कमेंट, रिप्लाय देत म्हणाला...

हेमा मालिनी यांच्या गुरू माँने तेव्हा शाहरुख खान मोठा सुपरस्टार होणार असल्याची भविष्यवाणी केल्याचा खुलासाही त्यांनी केला. त्या म्हणाल्या, "मी एक चित्रपट बनवत आहे, असं मी गुरु माँ यांना सांगितलं. तेव्हा त्यांनी तुला एक मोठा सुपरस्टार मिळाला आहे, असं सांगितलं. त्यांचं म्हणणं मला तेव्हा कळालं नव्हतं. त्यामुळे मी त्यांना माझ्या चित्रपटातील हिरो नवा आहे, असं सांगितलं. तेव्हा त्या तुला मोठा हिरो मिळणार आहे, असं म्हणाल्या होत्या. त्यांना भविष्य दिसलं होतं. आणि आज शाहरुख खान सुपरस्टार आहे." 
 

Web Title: actress hema malini revealed that her guru maa already predicted shah rukh khan stardom